हजेरीसाठी अॅप उघडताच दिसला अश्लील व्हीडीओ online student attendance
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत संचालित विविध आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना नियमित व वेळेवर उपस्थित राहण्यासाठी ‘एएमएस अॅप’ देण्यात आला आहे. या अॅपवर
ठेवण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे.
आश्रमशाळांवर विशेष लक्ष दिले जात आहे. येथील कर्मचाऱ्यांची
उपस्थिती थेट ऑनलाइन
कर्मचारी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करत असताना त्यावर अश्लील चित्र दिसू लागले. हा नेमका काय प्रकार आहे, हे कुणाचाच लक्षात येत नव्हते.
असे आपल्या सोबतच घडत आहे का, याची इतरांना विचारणा केल्यानंतर हॅकरने अॅप हॅक केल्याचे पुढे आले.
याबाबत प्रकल्प अधिकारी कार्यालयाला सूचित करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना बसला धक्का
कर्मचारी शाळेत गेल्यानंतर आपली उपस्थिती वेळेसह नोंदवितात. मंगळवारी आक्रीत घडलं, अॅप उघडताच त्यावर थेट पॉर्न दिसणे सुरू झाले. नेमकं काय होतंय, हे कुणालाच सुचेना.
काही तरी गडबड होतेय, हे लक्षात आल्याने एकमेकांकडे कर्मचारी विचारणा करू लागले यातून अॅप हॅक झाल्याचा प्रकार उघड झाला.
आदिवासी विकास विभागाने
कर्मचाऱ्यांवर नियंत्रण
अॅपच्या माध्यमातून घेतली जाते. यासाठी एएमएस अॅप वापरला जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने हा अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून ठेवला आहे.
त्यावरचा क्यूआर कोड स्कॅन करून उपस्थितीची नोंद केली जाते. मंगळवारी सकाळी ७:३० वाजता पांढरकवडा येथे सकाळीच
अतिशय घृणास्पद प्रकार
केवळ पांढरकवडा प्रकल्प आदिवासी विकास विभागाकडूनच एएमएस अॅप कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. इतर कुठेही हजेरीसाठी असे अॅप वापरले जात नाही.
या अॅपवर मंगळवारी सकाळी अश्रील व्हिडीओ व चित्र आल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
प्रकल्प कार्यालयाने अॅप घेताना त्याच्या सुरक्षेबाबतही दक्षता घेणे गरजेचे होते. याची वरिष्ठांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात येईल
, असे आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष साहेबराव मोहोड यांनी सांगितले.