प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या उपस्थिती माहितीची पडताळणी करणेबाबत online attandance 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या उपस्थिती माहितीची पडताळणी करणेबाबत online attandance 

संदर्भ: शासन निर्देश क्रः संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ६५/एस.डी. ३ दि. २१.०३.२०२४.

महोदय,

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्हयातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. शाळांनी दैनंदिन नोंदविलेली उपस्थितीची माहिती केंद्र शासनाच्या Automated Monitoring System प्रणालीवर दर्शविण्यासाठी पाठविण्यात येते. सदर प्रमाणे भरलेल्या माहितीचे केंद्र शासनाद्वारे दैनंदिन तपासणी केली जाते. तथापि, जिल्ह्यातील सर्व शाळांद्वारे सदर प्रमाणे माहिती नियमितपणे भरली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या दैनंदिन AMS अहवालामध्ये राज्यातील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, सदर योजनेंतर्गत लाभ दिलेल्या विद्यार्थीची दैनंदिन माहिती विहीत कालावधीत त्याच दिवशी भरण्याबाबत सर्व मुख्ययाध्यापक/शाळाप्रमुखांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात. तसेच प्रस्तुत बाबतचे सनियंत्रण करणेबाबत गटशिक्षणाधिकारी / अधीक्षक यांना सूचना देणेत याव्यात. सदरप्रमाणे माहिती विहित कालावधीत न भरल्यास जबाबदार असणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. सोबत : ऑनलाईन माहिती पाहावयाचे मॅन्युअल

online attandance
online attandance

1 thought on “प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या उपस्थिती माहितीची पडताळणी करणेबाबत online attandance ”

Leave a Comment