स्वखर्चाने मतदान केंद्रांवर जाण्यास शिक्षकांचा नकार on election duty
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर: सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, या निवडणुकीत शिक्षकांना मतदान केंद्रावरील जबाबदारी देण्यात आली असून, स्वखर्चाने मतदान केंद्रावर येण्यास सांगितले आहे; मात्र स्वखर्चाने मतदान केंद्रावर जाण्यास शिक्षकांनी नकार दिला आहे. याबाबत शिक्षक भारती संघटनेने निवासी
उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन दिले आहे.
कर्मचाऱ्यांना स्वतःच्या जबाबदारीवर व स्वखर्चाने नियुक्तीच्या ठिकाणी यायला सांगितले आहे. निवडणूक कामाचा तणाव, खासगी वाहतुकीचा प्रवास, वाहतुकीची गैरसोय, वेळेचे बंधन यामुळे अडचणी येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या स्थानिक मतदारसंघातून नियुक्त मतदारसंघापर्यंत ने-आण करण्याकरिता शासकीय वाहनांची सोय करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, उपाध्यक्ष रियाजअहमद अत्तार, शाहू बाबर, शशी पाटील, अमोल तावसकर, देवदत्त मेटकरी, नितीन रुपनर, शरद पवार, मायाप्पा हाके आदी पदाधिकारी उपस्थित होते