‘ते’ सरकारी कर्मचारी खूखुश; ‘जुनी पेन्शन’चा मिळणार लाभ old penshan scheme
नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नंतर रुजू झालेल्यांनाच फायदा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जुन्या पेन्शनबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यानुसार, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.
वर्तमान पत्र कात्रण येथे पहा
👉PDF download
Old penshan scheme सन २००५ पासून राज्यात नवी पेन्शन योजना लागू झाली. त्यामुळे २००५ नंतर शासकीय सेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढला होता,
लाभासाठी द्यावा लागणार पर्याय या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुना निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून ६ महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे. जे राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी या ६ महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना नवी पेन्शन योजना लागू राहील. तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहणार आहे.
…या असतील अटी
जुनी निवृत्तीवेतन व अनुषांगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे.
■ हा कर्मचारी पात्र ठरल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकायाने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत द्यावे.
■ तसेच संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन पेन्शन योजनेचे खाते तत्काळ बंद केले जाईल.
■ त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्यात येईल आणि सदर खात्यात नवीन पेन्शनच्या हिश्शाची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल.
केवळ ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांनाच लाभ
शासकीय सेवेतील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होती. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा राज्यातील केवळ ४ ते ५ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना होणार आहे.
– ग. दी. कुलथे, मुख्य सल्लागार, राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ
राज्य मंत्रिमंडळ निर्णय
दुधासाठी ५ रुपये प्रतिलिटर अनुदान
१ राज्यातील दूध उत्पादक शेतकयांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येणार आहे.
● सहकारी व खासगी दूध संघांनी शेतकऱ्यांना ३.५ फॅट / ८.५ एसएनएफ या गुणप्रतीकरिता किमान २७ रुपये प्रतिलिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाइन जमा करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांना
■ अटलबिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी टोल निश्चित करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
■ सर्वसाधारणपणे टोल
आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने टोल आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
• त्यानुसार कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये टोल आकारण्यात येणार आहे. टोल दराचा एक वर्षानंतर पुन्हा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रतिलिटर बैंक खात्यावर डीचीटीद्वारे देण्यात येतील. ही योजना ११ जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०२३ मधील
● आकडेवारीनुसार सहकारी व खासगी दूध संघामार्फत दररोज १४९ लाख लिटर दूध संकलित केले जाते. ५ रुपये प्रतिलिटरप्रमाणे १ महिन्यासाठी २३० कोटी अनुदान आवश्यक राहील. तथापि, दूध संकलनातील घट वा वाढ झाल्यास उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे.
शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी किमान २५० रुपये टोल