पोकळ घोषणेने पेन्शनधारकांची फसवणूक; विश्वास उटगी यांचा आरोप old penshan scheme
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने सरकारी योजनेतील कर्मचारी समूहाला खूश करण्यासाठी ज्या घोषणा करून आश्वासन दिले ते तांत्रिकदृष्ट्या व आर्थिक गणित पाहता पेन्शनधारकांची पूर्ण फसवणूक झाली असून, आगामी ■ निवडणुकीतील मतांच्या जोगव्यासाठी सरकारने सभागृहात पोकळ व फसवी घोषणा केली आहे, असा आरोप बँकिंग, पेन्शन, विमा, भांडवली आंतरराष्ट्रीय बाजार क्षेत्रातील अभ्यासक अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी ■ यांनी मुंबईत जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी ते म्हणाले, “सरकारची अधिवेशनातील फसवी घोषणा कामगार संघटना मान्य करत आनंद साजरा करत आहे हे दुर्दैव आहे. सरकारने
पेन्शनप्रमाणे कामगारांच्या अनेक योजनांचा गुंता करून ठेवला आहे. कामगार संघटना नेते व सामान्य कामगार यांच्यात मतभेद पाहावयास मिळत आहेत. कामगार संघटना भाजपच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत.”
हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान इतर राज्यात काँग्रेस पक्षाने योजना लागू केली आहे. हे महाराष्ट्र राज्यात का शक्य नाही? सरकारी कर्मचारी व अधिकारी मूर्ख नाहीत त्यांना सर्व समजते. पण कामगार नेत्यांचे काय करायचे? राजकीय पुढारी विकले जातात हे सर्वज्ञात आहे, पण हे कामगार नेते अशी कृती करून अधिक धोकादायक आहेत हे मत बनले, तर दोष कुणाचा? असा सवाल विश्वास उटगी यांनी केला.