राष्ट्रीय जंतनाशक दिवस – १३ फेब्रुवारी २०२४ – मार्गदर्शक सूचना national jant nashak day

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय जंतनाशक दिवस – १३ फेब्रुवारी २०२४ – मार्गदर्शक सूचना national jant nashak day

* तांत्रिक मार्गदर्शक सुचना राष्ट्रीय जंतनाशक दिन (एन.डी.डी.) हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्तेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन (एन. डी. डी.) हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात (राज्य विशिष्ट STH व्याप्तीवर आधारित) शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम फेब्रुवारी २०२४ मध्ये आयोजित करणे महत्वाचे आहे.

उद्देशः-

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १-१९ वर्षे वयोगटातील सर्व मुलां मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.

1) अंमलबजावणीः-

अ) मोहिमेची तारीख

१३ फेब्रुवारी २०२४ – राष्ट्रीय जंतनाशक दिन

२० फेब्रुवारी २०२४ – मॉप अप दिन

ब) लाभार्थी :-

१ ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालके

१ ली ते ५ वीतील (६ ते १० वर्ष वयोगटातील) शाळेत जाणारी सर्व मुले मुली

६ वी ते १२ वीतील (१० ते १९ वर्ष वयोगटातील) शाळेत जाणारी सर्व मुले – मुली

६ ते १९ वर्ष वयोगटातील शालाबाहय सर्व मुले-मुली

क) मोहिम राबविण्याचे जिल्हे व नगरपालिका :-

राज्यातील ३४ जिल्हे व २७ मनपा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम राबविण्यात यावी

ड) मोहिम राबविण्यासाठीच्या संस्था

.

शाळाः- सर्व शासकीय शाळा/शासकीय अनुदानित शाळा/आश्रम शाळा/महानगरपालिका शाळा सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी विनाअनुदानित शाळा, आर्मी स्कूल, सी.बी.एस.ई. स्कूल, नवोदय विदयालय, सुधार गृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकूल, संस्कार केंद्रे,

महाविद्यालय :- सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी (नर्सिंग कॉलेज, आय. टी. आय., पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविद्यालय, डी. एड महाविद्यालय इ.)

अंगणवाडी :- सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे

औषधी व्यवस्थापनः-

कार्यक्रमासाठी लागणाऱ्या जंतनाशक गोळ्याचे (Tab. Albendazole 400 mg) व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे-

१. शाळा / महाविदयालयासाठी १ गोळी १ ली ते १२ वी मध्ये शिकणारे सर्व मुले व मुली तसेच कनिष्ठ महाविदयालय व वरिष्ठ महाविदयालयाच्या प्रथम वर्षाचे विदयार्थी

लाभार्थ्यांची अद्ययावत यादी अंगणवाडी केंद्र स्तरावर उपलब्ध असावी.

• सर्व अंगणवाडी केंद्रावर १ ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना जंतनाशक गोळी देण्यात यावी. तसेच ६ ते १९ वर्ष वयोगटातील शालाबाहय मुला मुलींना जंतनाशक गोळी देण्यात यावी.

• आशा कार्यकर्तीने १ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना 7 epsilon ne9 ९ वर्ष वयोगटातील शालाबाहय मुला मुलींना अंगणवाडी केंद्रावर घेऊन यावे.

• सर्व शासकीय, शासकीय अनुदानित शाळा, आश्रम शाळा, महानगरपालिका शाळा व खाजगी अनुदानित शाळा व सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांमधून १ ली ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात यावी.

• सर्व आरोग्य सेवक / सेविका, आरोग्य सहाय्यक यांनी प्रत्येक शाळा व अंगणवाडी केंद्रास भेट देऊन त्यांना सहकार्य करावे.

• महत्वाचे –

१ वर्षाखालील लाभार्थ्यांना अल्बेंडॅझोलचे गोळी देण्यात येऊ नये.

१ ते २ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेंडॅझोलची अर्धी गोळी (२०० मि.ग्रॅ.) देण्यात यावी. या गोळीची पावडर करुन पाण्यात विरघळूनच मुलांना दयावी.

• २ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेंडॅझोल (४०० मि.ग्रॅ.) ची एक गोळी दयावी. या गोळीची पावडर करुन पाण्यात विरघळूनच मुलांना दयावी.

• ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्बेडॅझोल (४०० मि.ग्रॅ.) ची एक गोळी दयावी. ही गोळी मुलास दातानी चावून खाण्यास सांगावी किंवा गोळी चावून खाता येत नसल्यास गोळीची पावडर करुन पाण्यात विरघळून दयावी. याबाबत कोणतीही तडजोड करु नये व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

६ ते १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींना गोळी चाऊन खाण्यास लावणे.

गोळी दिल्यानंतर सर्व बालकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पिण्यास द्यावे.

या साठी प्रत्येक सत्राच्या ठिकाणी स्वच्छ पाणी उपलब्ध असावे.

जंतनाशक औषधी दिलेल्या सर्व लाभार्थ्यांची नावे नोंदवही मध्ये नोंद करावी.

मोहिम सुरु असताना विविध वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अल्बेंडाझोल गोळया या लाभार्थ्यांच्या नातेवाईकाच्या हातात देण्यात येऊ नयेत किंवा लाभार्थ्याच्या नातेवाईकास घरी घेऊन जाण्यासाठी देऊ नयेत.

एखाद्या बालकास जंतनाशक औषधाची मात्रा दिल्यानंतर उलटी/वांती झाल्यास पुनःश्च डोस देण्यात येवू नये.

आजारी असणाऱ्या मुला मुलींना जंतनाशकदिनी/मॉप-अपदिनी अल्बेंडाझोलची गोळी (जंतनाशक गोळी) देवू नये. तथापि त्यांना ते पूर्णतः बरे झाल्यानंतर जंतनाशक गोळी वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावी.

जंतनाशक गोळी दिल्यानंतर लाभार्थ्यास / विद्यार्थ्यास दोन तास अंगणवाडीत / शाळेत थांबण्यास सांगावे, जेणेकरुन काही संभाव्य विपरीत परिणाम झाल्यास ताबडतोब काळजी घेणे सुलभ होईल.

ज्या मुला – मुलींना दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी जंतनाशक गोळी दिली नसेल त्यांना दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजीच्या

मॉप-अप दिनी गोळी द्यावी.

शाळा व अंगणवाडी केंद्रांनी त्यांचेकडे असलेला उर्वरित जंतनाशक गोळयांचा साठा आरोग्य सेवक/सेविका यांना मॉप- अप दिनानंतर परत करावा.

सर्व शाळा, आश्रम शाळेतील प्रत्येक वर्गात व अंगणवाडीत ( Emergency Helpline No.) संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सेवक/सेविका, वैद्यकिय अधिकारी यांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक (A४ साईज मध्ये) प्रिंट काढून लावावेत.

• जंतनाशक गोळी दिल्यानंतर काही विपरीत परिणाम (मळमळ उलटी/पोटदुखी / अतिसार) झाल्यास त्वरीत टोल फ्री क्र.१०४ वर संपर्क साधावा व आवश्यकतेनुसार १०८ चा वापर संदर्भ सेवेसाठी करावा आणि दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करावी. तसेच आरोग्य सेवक/सेविका, वैद्यकिय अधिकारी यांनाही कळवावे.

• गुंतागुंतीचे प्रसंग झाल्यास करावयाची कार्यवाहीः-

अल्बेंडाझोलची गोळी ही लहान मुलांसाठी तसेच मोठयांसाठी सुरक्षित जंतनाशकाची गोळी आहे.

जंतनाशक औषधीमुळे होणारे दुष्परिणाम किरकोळ स्वरुपाचे आहेत त्यात सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे हे सर्व लाभार्थीच्या शरीरात जंतसंसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होते. हे सर्व दुष्परिणाम थोडयाच वेळात नाहीसे होतात. हे दुष्परिणाम तात्पुरते असून शाळा व अंगणवाडी केंद्रावर सहजगत्या हाताळण्यासारखे आहेत.

सौम्य प्रकारच्या दुष्परिणामांकरीता :-

असे काही झाल्यास ताबडतोब हेल्प लाईन नंबर १०४ वर संपर्क साधावा.

लाभार्थ्याला सावलीत विश्रांती करण्यास घेऊन जावे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.

या लाभार्थ्याला किमान दोन तास देखरेखीखाली ठेवावे.

अशा वेळी तीव्र स्वरुपाचे दुष्परिणाम आढळून आल्यास नजिकच्या आरोग्य संस्थेत लाभार्थ्याला घेऊन जावे. शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्ती यांना याबाबतचे प्रशिक्षण राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या प्रशिक्षणाच्या वेळी देण्यात यावे.

मुख्याध्यापक, शिक्षक कार्यकर्त्यांसाठी, अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी:-

जंतनाशकाच्या गोळीमुळे होणाऱ्या किरकोळ गुंतागुंतीच्या प्रसंगासाठी तयार असावे.

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण रुग्णालय/हेल्थ पोस्ट, आरोग्य सेविका सेवक यांचे तात्कालीन संपर्क नंबर शाळेत व अंगणवाडी केंद्रावर दर्शनीय भागात प्रदर्शित करुन ठेवावे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनी व मॉप अप दिनी शिक्षकांनी व अंगणवाडी कार्यकर्तीनी अल्बेंडाझोलची गोळी स्वतः देखरेखीखाली द्यावी.

वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी :-

.

अॅडव्हर्स इव्हेंट मॅनेजमेंटच्या प्रोटोकॉल प्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांनी सर्व महत्वाच्या औषधी आरोग्य केंद्रात उपलब्ध असल्याची खात्री करावी.

गुंतागुंती प्रसंगाच्या वेळी तातडीने सेवा उपलब्ध करुन देण्यास Rapid Response (क्र. १०८) ची टीम तयार ठेवावी.

तीव्र स्वरुपाच्या गुंतागुंतीच्या प्रसंगासाठी :-

दुष्परिणाम बाधित लाभार्थ्याला इतरांपासून वेगळे करावे व जंतनाशक मोहिम थांबवावी.

संयम बाळगून ही प्रतिक्रीया बहुदा तीव्र जंतबाधेमुळे झाली असल्याची शक्यता आहे असे सांगावे.

अंगणवाडी कार्यकर्तीनी झालेल्या घटनेबद्दलची संपूर्ण माहिती त्वरित आरोग्य सेविका / सेवक / वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र / हेल्थ पोस्ट यांना द्यावी.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी झालेल्या घटनेबद्दलची संपूर्ण माहिती त्वरित आरोग्य सेविका / सेवक / वैद्यकीय अधिकारी,

प्राथमिक आरोग्य केंद्र / हेल्थ पोस्ट यांना द्यावी.

रुग्णवाहिकेमधून ताबडतोब लाभार्थ्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा ग्रामीण रुग्णालयास संदर्भीत करावे.

लाभार्थ्यांच्या पालकांना त्वरीत सूचित करावे.

आरोग्य सेविकेने या आजारी लाभार्थ्यांबरोबर जावे व त्यांना तात्काळ उपचार उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी.

आरोग्य सेविकेने तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांना झालेल्या घटनेबद्दल अवगत करावे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी घटनेचा अहवाल तयार करुन जिल्हा आरोग्य अधिकारी / वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका / जिल्हा शल्य चिकित्सक यांना त्याच दिवशी सादर करावा.

II) प्रसार माध्यमांना हाताळणे :-

प्रसार माध्यमांशी बोलायला एक प्रवक्ता निश्चित करावा.

प्रवक्त्याने शांतपणे व संयमाने झालेल्या घटनेची माहिती द्यावी व ही घटना जंतनाशक गोळीमुळे झाली नसावी याबद्दल शाश्वती द्यावी.

प्रसारमाध्यमांशी चर्चेपूर्वी जंतनाशक मोहिमेची मुख्य उद्दीष्टे, संदेश तयार करावेत. तसेच काही महत्वाच्या प्रश्नांसाठी उत्तरे तयार करावीत.

मुख्य संदेश हे जंतनाशकाचे फायदे व मुलांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे आहेत यावर केंद्रीत असावेत.

तीव्र स्वरुपाचे दुष्परिणाम झाल्यास तात्काळ कसून तपास करुन वस्तुस्थितीबाबत अवगत करावे.

तीव्र स्वरुपाचे दुष्परिणाम होऊ नये यासाठी शाळा व अंगणवाडी यांनी काय करावे व काय करु नये :-

> काय करावे :-

नजिकच्या आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तसेच आरोग्य सेवक / सेविकेच्या फोन नंबरचे (भ्रमण ध्वनी क्रमांक) फलक (A ४ पेपर वर प्रिंट करुन) शाळेतील प्रत्येक वर्गातील दर्शनिय भागात लावावेत.

स्वतःच्या देखरेखीखाली मुलांना गोळी चावून खाण्यास लावणे.

ज्या मुलांना गोळी चावून खाता येत नाही अशांना गोळीची पावडर करुन नंतर पाण्यात विरघळून पिण्यास लावणे.

> काय करु नये :-

आजारी बालकांना जंतनाशकाची गोळी देऊ नये.

जंतनाशकाची गोळी न चावता तशीच गिळण्यास सांगू नये.

जंतनाशकाची गोळी घरी खाण्यासाठी पालकांच्या हातात देऊ नये.

बालकाच्या घशात गोळी अडकून श्वास गुदमरल्यास तातडीने काय करावेः-

१) लहान बालकांमध्ये :-

अ) लहान बालकास आपल्या मांडीवर पालथे झोपवून (बालकाची छाती मांडीवर येईल असे)

बालकाचे डोके तुमच्या मांडीच्या खालच्यास्तरावर असावे. तुमच्या तळहाताने बालकाच्या पाठीच्या मध्यभागी ५ ते ६ वेळा थोपटावे, जेणेकरुन गोळी घश्याबाहेर सरकेल.

ब) हे यशस्वी न झाल्यास बालकाला मांडीवर उताणे (पाठीवर) झोपवून तूमच्या दोन बोटांनी बालकाची छाती दाबावी असे ५ ते ६ वेळा करावे.

क) वरील उपाय करुनही गोळी न निघाल्यास बालकास ताबडतोब आरोग्य केंद्रास संदर्भित करावे.

२) मोठया बालकांसाठी :-

अ) बालकास आपल्या मांडीवर पालथे झोपवून (बालकाचे पोट मांडीवर येईल असे) बालकाचे डोके तुमच्या मांडीच्या खालच्यास्तरावर असावे. तुमच्या तळहाताने बालकाच्या पाठीच्या मध्यभागी ५ ते ६ वेळा थोपटावे, जेणेकरुन गोळी घश्याबाहेर सरकेल.

ब) हे यशस्वी न झाल्यास बालकाला उभे करुन पाठीमागून बालकाच्या छातीच्या पिंजऱ्याखाली धरावे व बालकाचे शरीर वर जाण्यासारखे दाबावे.

क) वरील उपाय करुनही गोळी न निघाल्यास बालकास ताबडतोब आरोग्य केंद्रास संदर्भित करावे.

III) नोंदी व अहवाल सादरीकरण :-

अ) शाळा / महाविदयालय करिता वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी दिली अशा विद्यार्थ्यांची नोंद वर्ग शिक्षकाने खालील प्रमाणे ठेवावी.

जंतनाशक गोळी दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नावा पुढे (1) अशी खूण करावी.

ज्या विद्यार्थ्यांना जंतनाशक दिनी गोळी दिली नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करावी.

अशा वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मॉप-अप दिनी दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी गोळ्या देऊन त्यांच्या नावापुढे दोन टिक मार्क (√√) करावेत.

मॉप-अप दिनाच्या शेवटी दोन टिकमार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोजून त्याबाबतचा अहवाल मुख्याध्यापकांना सादर करावा.

मुख्याध्यापकांनी दोन्ही दिवसांचा शाळेचा एकत्रित अहवाल २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संबंधित आरोग्य सेवक/सेविका, वैद्यकिय अधिकारी यांचेकडे सादर करावा.

. राष्ट्रीय जंतनाशक दिन राबवित असणाऱ्या जिल्हयांच्या सर्व नगर पालिका क्षेत्रातील शाळांनी त्यांचा अहवाल संबंधित वैदयकीय अधिक्षक यांच्याकडे सादर करावा.

ब) अंगणवाडी केंद्राकरीता

अंगणवाडी कार्यकर्ती या १ ते ६ वर्षाच्या सर्व व शाळाबाहय ६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या मुला – मुलींसाठी पुढील प्रमाणे नोंदी ठेवतील.

ज्या बालकांना जंतनाशकदिनी जंतनाशक गोळी दिली अशा बालकांच्या नावापुढे एक टिक मार्क (1) करावी.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या दिवशी जंतनाशक गोळी न मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करुन आशा कार्यकर्तीला दयावी. आशा कार्यकर्तीने अशा सर्व लाभार्थ्यांच्या घरी भेटी देवून त्यांना मॉप-अप दिनी जंतनाशक गोळी घेण्यास प्रवृत्त करावे.

ज्या लाभार्थ्यांना मॉप-अप दिनी अंगणवाडीमध्ये जंतनाशकची गोळी देण्यात येईल त्यांच्या नावापुढे दोन टिक मार्क (√√) करण्यात यावेत व अशा सर्व एकत्रित लाभार्थ्यांचा अहवाल तयार करावा व २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा एकत्रित अहवाल आरोग्य सेवक/सेविका यांचेकडे सादर करावा.

क) राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा अहवाल खालील पध्दतीने सादर करावयाचा आहे. ई – मेल द्वारे:-

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्हयाचा ग्रामीण व शहरी यांचा संकलीत अहवाल दिलेल्या नमुन्यांमध्ये arshcell२@gmail.com या ई-मेल वर न चुकता दि. २६.०२.२०२४ पर्यंत पाठवायचा आहे. तसेच गुगल शीटवर मोहिम झाल्यानंतर म्हणजेच दि. १३.०२.२०२४ चा अहवाल दि. १४.०२.२०२४ रोजी व मॉप दिन दि. २०.०२.२०२४ रोजीचा अहवाल दि. २१.०२.२०२४ रोजी अदयावत करण्यात यावा.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका यांनी महानगरपालिकेचा संकलीत अहवाल दिलेल्या

नमुन्यांमध्ये arshcell२@gmail.com या ई-मेल वर न चुकता दि. २६.०२.२०२४ पर्यंत पाठवायचा आहे. तसेच गुगल शीटवर मोहिम झाल्यानंतर म्हणजेच दि. १३.०२.२०२४ चा अहवाल दि. १४.०२.२०२४ रोजी व मॉप दिन दि. २०.०२.२०२४ रोजीचा अहवाल दि. २१.०२.२०२४ रोजी अदयावत करण्यात यावा.

प्रत्येक पातळीवर जंतनाशक दिनाचा अहवाल सादर करण्याबाबतची सविस्तर माहिती खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे करण्यात यावी.

राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे अहवाल पाठविण्याची अंतिम तारीख ०१.०३.२०२४ आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपले अहवाल या कार्यालयास न चुकता दि. २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत येतील याची दक्षता घ्यावी.

IV) प्रशिक्षण :-

प्रशिक्षण हे तीन स्तरांवर द्यावे.

१. जिल्हा स्तरावर :-

जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी (ICDS), तालुका शिक्षण अधिकारी यांना प्रशिक्षण द्यावे.

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय यांच्या वैद्यकीय अधिक्षक यांना प्रशिक्षण दयावे.

वैदयकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका यांनी हेल्थ पोस्टच्या वैदयकीय अधिकारी तसेच शहरी बालविकास प्रकल्प अधिकारी (Urban ICDS) व शिक्षण अधिकारी मनपा यांना प्रशिक्षण द्यावे.

२. तालुकास्तर

महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत तालुकास्तरावर सर्व पर्यवेक्षिकेचे प्रशिक्षण हे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या नियमित मासिक सभेत घ्यावे.

• तालुका शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, शासकीय अनुदानित, खाजगी अनुदानित शाळा व सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण हे त्यांच्या मासिक सभेत

घ्यावे.

• तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणास हजर रहावे.

३. प्राथमिक आरोग्य केंद्र / हेल्थ पोस्ट / ग्रामीण रुग्णालय / उपजिल्हा रुग्णालय स्तर :-

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ए. एन. एम. व शाळेच्या नोडल शिक्षक यांना राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे प्रशिक्षण द्यावे. (एम. पी. डब्ल्यू, आरोग्य सहाय्यक, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांचे प्रशिक्षण दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या मासिक बैठकीमध्ये माहे जानेवारी दिनांक २९ ते ३१ या कालावधीत घेण्यात यावे.)

उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय स्तरावर वैदयकीय अधिक्षक यांनी त्यांच्या अंत नगरपालिका ए.एन.एम. / एम. पी. डब्ल्यू, अंगणवाडी कार्यकर्ती व शाळेच्या नोडल शिः

8/15

जंतनाशक दिन मोहिमेचे प्रशिक्षण द्यावे. सदर प्रशिक्षणास तालुका आरोग्य अधिकारी यांनी उपो…..

• महानगरपालिकेतील हेल्थ पोस्ट स्तरावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ए. एन. एम., अंगणवाडी कार्यकर्त्या व म्युन्सिपल व खाजगी शाळांच्या नोडल शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे.

प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची एक प्रत काढून प्रत्येकास देण्यात यावी.

जिल्हा स्तरावरचे प्रशिक्षण दि.१८ जानेवारी २०२४ ते १९ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे. प्राथमिक आरोग्य

केंद्र / हेल्थ पोस्ट / ग्रामीण रुग्णालय / उपजिल्हा रुग्णालय स्तरावरचे प्रशिक्षण दि. २५ जानेवारी २०२४ ते दि. २८ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे. हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी अनुदानाच्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत.

शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या प्रशिक्षणाच्या वेळी त्यांना प्रशिक्षण साहित्य (राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची माहिती, एफ. ए. क्यूज, अहवाल नमूना, प्रतिकूल घटना घडल्यास अहवाल नमूना, राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे प्रसिध्दी साहित्य (बॅनर्स, पोस्टर्स इ.) व लाभार्थी संख्येप्रमाणे लागणा-या जंतनाशक (अल्बेंडाझोल ४०० मी. ग्रॅ.) गोळयांचा साठा याचे वाटप करावे.

• जनजागृती व जनसंपर्क :-

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जनजागृती आवश्यक आहे. या राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेसाठी खालील प्रकारे जनजागृती करण्यात यावी.

प्रत्येक संस्थेने राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या दिवशी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे उद्घाटन स्थानिक लोप्रतिनिधींच्या हस्ते करुन करुन छायाचित्र (फोटो) ईमेल व व्हाट्सअप वर पाठवावे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्दी द्यावी.

महत्वाचे संदेश हे साध्या, सोप्या व स्थानिक भाषेत असावेत. जनजागृतीचे संदेश हे पालकांना जागरुक करुन आपल्या पाल्यास जंतनाशक दिनी जंतनाशक गोळी घेण्यास प्रवृत्त करतील असे असावेत.

काही कारणास्तव ज्या बालकांस राष्ट्रीय जंतनाशक दिनी (१३ फेब्रुवारी २०२४) जंतनाशक गोळी दिली गेली नसेल, अशा वंचित सर्व बालकांना २० फेब्रुवारी २०२४ रोजी मॉप-अप दिनी ही गोळी देण्यात येईल अशी जनजागृती करावी.

जनजागृतीसाठी दैनिक वृत्तपत्रामध्ये आवाहन, स्थानिक रेडिओ व केबल चॅनलव्दारे जनजागृती, भिंतीवर म्हणी तसेच सामाजिक वार्तालापाव्दारे या मोहिमेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी.

ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण समिती व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सभासदांना अंगणवाडी कार्यकर्ती व आशा यांच्या मदतीने एकत्र आणून त्यांना जंतनाशकाचे महत्व पटवून द्यावे व जास्तीत जास्त बालकांना याचा लाभ देण्यात यावा.

मोहीमेअंतर्गंत सर्व शाळा, अंगणवाडी केंद्राना व आरोग्य संस्थांना राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे प्रसिध्दी साहित्य (बॅनर, पोस्टर्स इ.) पोहचवावे. जंतनाशक गोळी दिल्यानंतर उद्भवणारे साईड ईफेक्ट बाबत माहितीचा समावेश असलेले पोस्टर दर्शनीय भागात लावणे.

• राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या एक दिवस अगोदर अंगणवाडीमधून प्रभात फेरीद्वारे जनजागृती करावी.

कार्यक्रम राबविताना येणाऱ्या अडचणींचे समाधान करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाची हेल्पलाईन क्र.१०४ चा वापर करावा.

गाव पातळीवर आशांनी सर्व पालकांची सभा घेऊन मुलांमध्ये कृमी दोषांचे परिणाम, जंतनाशकाचे फायदे व कृमी संसर्ग न होण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीमध्ये करावयाचे बदल याबाबत मार्गदर्शन करावे.

V) पर्यवेक्षण व संनियंत्रण :-

जिल्हा व तालुका स्तरावर राष्ट्रीय जंतनाशक दिनासाठी सनियंत्रण पथके स्थापन करावीत व त्यांनी जंतनाशक दिनाच्या दिवशी (१३ फेब्रुवारी २०२४) व मॉप-अप दिनाच्या दिवशी (२० फेब्रुवारी २०२४) शाळा व अंगणवाडी केंद्राना भेटी दयाव्यात.

जिल्हा व तालुकास्तरावरील पर्यवेक्षकांनी पर्यवेक्षण व सनियंत्रणासाठी दिलेल्या विहित प्रपत्राप्रमाणे उपयोग करुन पर्यवेक्षण करावे.

प्रत्येक जिल्हयाने या कार्यक्रमासाठी जिल्हा नोडल अधिकारी नेमावा व त्यांनी पर्यवेक्षण व संनियंत्रणासाठी शिक्षण व महिला व बाल विकास विभागांशी समन्वय साधवा.

जिल्हा व तालुकास्तरावरील पर्यवेक्षकांनी पर्यवेक्षण व संनियंत्रणासाठी वापरलेले विहित प्रपत्र हे आरोग्य विभागाच्या जिल्हा नोडल अधिकारी यांचेकडे सादर करावेत.

VI) जिल्हास्तरीय समन्वय समिती व विविध विभागांच्या जबाबदाऱ्या

अ) जिल्हा स्तरीय समन्वय समिती –

जिल्हास्तरीय समन्वय समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, (महानगरपालिका), जिल्हा शिक्षण अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल विकास व खाजगी शाळेतील संघाचा जिल्हास्तरीय प्रतिनीधी, जिल्हास्तरीय PRI अधिकारी (DPRO), समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद इ. आणि डेव्हलमपेंट पार्टनरचे अधिकारी, मदरशाचे प्रतिनिधी, पोलिस मुख्यालयाचे प्रतिनिधी असावेत. या समन्वय समितीचे कार्य राष्ट्रीय जंतनाशक

जंतनाशक मार्गदर्शक सूचना pdf येथे पहा

👉👉pdf download 

Leave a Comment