महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ मध्ये वेगवेगळया पदांसाठी भरती msrtc recruitment
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ मध्ये पदांसाठीची जाहिरात येथे पहा 👇
१. शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथे शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस सोडुन कामकाजाच्या दिवशी सकाळी 2 vec H १३.०० या वेळेत दिनांक ०७.०३.२०२४ पर्यंत मोफत मिळतील.
२. शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गाकरिता रु.५००/- अधिक रु. ९०/- जी.एस.टी. असे एकुण रु.५९०/- व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु. २५०/- अधिक रु.४५/- जी.एस.टी. असे एकुण रु. २९५/- असे राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्कासहित उमेदवाराने सदर शुल्क रा.प. महामंडळाच्या खात्यावर RTGS / NEFT व्दारे भरणा करण्यांत यावा व बँकेकडुन UTR No. पावती अर्जासोबत जोडावी. उमेदवारांने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
३. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी विहीत नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याची प्रमाणीत केलेली झेरॉक्स प्रत अर्ज घेतेवेळी सादर करणे आश्यक आहे.
४. उमेदवाराने अर्ज घेतल्या नंतर त्याच दिवशी अर्जातील संपुर्ण माहिती भरुन पुढील दर्शविलेल्या प्रमाणे शैक्षणिक दाखल्यांची / प्रमाणपत्राची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.
अ) शाळा सोडल्याचा दाखला.
ब) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र / गुणपत्रक (गुणपत्रकाची दोन्ही बाजु) यांत्रिक व्यवसायिक व आय.टी.आय. उत्तीर्ण गुणपत्र व प्रमाणपत्र तसेच व्होकेशनल एच.एस.सी. (१२ वी) एम.सी.व्ही.सी. (विषय कोड क्र.एम-१, एम-२. / एम-३)-उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
क) मागासवर्गीय उमेदवाराकरिता विहीत नमुन्यातील सुधारित जातीचा दाखला व प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे अत्यावश्यक आहे.
५. शिकाऊ उमेदवाराची निवड त्यांचे आय.टी.आय. उत्तीर्ण, व्होकेशनल अभ्यासक्रम, व्होकेशनल (इ.१२ वी) संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१, एम-२, एम-३ घेवुन उत्तीर्ण व अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक उत्तीर्ण या गुणांनुसार करण्यात येईल. शैक्षणिक पात्रता दिनांक ०७.०३.२०२४ रोजी 3 वर्षापुर्वीची नसावी.
६. उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मागर्दशन केंद्र कार्यालय / समाजकल्याण कार्यालय / एकात्मीक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इ.अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत नोंदणी पत्राची झेरॉक्स प्रत जोडण्यात यावी.
७. शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ०७.०३.२०२४ अंतिम राहील. उमेदवाराने अपुर्ण भरलेले व
मुदतीनंतर आलेले अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
८. शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ नुसार उमेदवाराने यापुर्वी कोणत्याही संस्थेत / कंपनीत प्रशिक्षण पुर्ण केले असल्यास अर्ज करु नये, त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
९. उमेदवारांने अलीकडे काढलेला स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो अर्जावर चिकटवुन सही करणे आवश्यक आहे.
१०. शिकाऊ उमेदवार म्हणुन निवड झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ अन्वये, शिकाऊ उमेदवारी सुधारीत कायदा १९७३ व १९८६ अन्वये करारनामा प्रशिक्षण पुर्ण होण्यापुर्वी लिहुन द्यावा लागेल तसेच प्रशिक्षण सुरु होण्यापुर्वी जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक यांचेकडुन वैद्यकिय तपासणी करुन घेण्यांत येईल. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शिकाऊ उमेदवारी बोलविण्यात येईल.
११. प्रशिक्षण पुर्ण होण्यापुर्वी कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ नुसार योग्य ती नुकसान भरपाई द्यावी लागेल.
१२. शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता वरील व्यवसायाकरिता वयोमर्यादा दिनांक ०७.०३.२०२४ रोजी पुर्ण करणे आवश्यक राहील.
१३. प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर उमेदवारांना म.रा.मा.प. महामंडळाचे सेवेत सामावुन घेण्यात येणार नाही. तसेच रा.प. सेवेत सामावुन घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही. यांची संबंधित उमेदवारांनी
नोंद घ्यावी.