प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत mid day meal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mid day meal
Mid day meal

Mid day meal प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत mid day meal

वाचा:-१) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, २००६.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१०/प्र.क्र.१८/प्राशि-४, दि.०२ फेब्रुवारी, २०११

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२११६/प्र.क्र.२००/एस.डी-३, दि.२७ ऑक्टोंबर, २०१६

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१८/प्र.क्र.२५०/एस.डी-३, दि.०५ फेब्रुवारी, २०१९

५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०१९/प्र.क्र.१२८/एस.डी-३, दि.१९ जुलै, २०१९

६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२०/प्र.क्र.८५/एस.डी-३, दि.२४ नोव्हेंबर, २०२१

७) केंद्र शासनाचे पत्र क्र.F.No.१-३/२०२१-Desk (MDM) – Part (2), दि.०७ ऑक्टोंबर, २०२२.

प्रस्तावना:-

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजनेंतर्गत इ.१ ली ते इ.५ वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.

केंद्र शासनाने दि.१४ एप्रिल, २०२० रोजीच्या आदेशान्वये सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात १०.९९ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. यानुसार संदर्भाधिन दि.२४ नोव्हेंबर, २०२१ च्या शासन निर्णयान्वये अन्न शिजविण्याच्या दरासाठीचे (Cooking Cost) प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रु.४.९७ आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रु.७.४५ याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती. केंद्र शासनाने संदर्भाधिन दि.०७ ऑक्टोंबर, २०२२ च्या आदेशान्वये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता दि.०१ ऑक्टोंबर, २०२२ पासून अन्न शिजविण्याच्या दरात ९.६ टक्के दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार संदर्भाधिन दि.०२/०२/२०११ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सदर दरवाढ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

१) प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आहाराचा पुरवठा करण्यास तसेच त्यासाठी सुधारित दरास मान्यता देण्यात येत आहे.

२) प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदूळाबरोबरच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. सदर धान्यादी मालापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक लाभार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३) प्रस्तुत योजनेमध्ये शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्था / बचत गट यांचेमार्फत शिजविलेल्या तयार आहाराचा पुरवठा विद्यार्थ्यांना करण्यात येतो. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर करुन तयार आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनुज्ञेय खर्च मर्यादा खालीलप्रमाणे राहील. सदर आहार खर्चाच्या मर्यादेत शासनाने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेणा अनुदान देय राहील.

४) सदरचे सुधारित दर केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दि.०१ ऑक्टोंबर, २०२२ पासून लागू होतील.

५) सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.३००/१४७१, दि.२० ऑक्टोंबर, २०२२ तसेच वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.१०३७/व्यय-५, दि.२८ ऑक्टोंबर, २०२२ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१११५१७२३३२८६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

 

Leave a Comment