निवडणूक कालावधीत वैद्यकीय रजे बाबत फक्त याच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय रजा मंजूर होणार medical leave
माझे असे ध्यानात आले आहे की, निवडणूकीच्या कालावधीत काही निवडणूकीशी संबंधित अधिकारी यांनी वैद्यकीय कारणास्तव रजेचे अर्ज दिले आहे. निवडणूक कालावधीतील जबाबदारीची आणि कालमर्यादीत कर्तव्ये पाहता कुणालाही सबळ कारणाशिवाय रजा देणे योग्य नाही. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव अर्ज सादर केलेल्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची त्वरीत शासकीय वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी करुन ते खरोखर शासकीय कामकाज करण्यास असमर्थ आहे किंवा कसे याची त्वरीत खात्री करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.