चार वर्षांपासून प्रलंबित असलेली १० कोटींची वैद्यकीय देयके मंजूर medical bill
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिकृती देयके मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. ते तत्काळ निकाली काढावीत, यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने फटाके फोडो आंदोलन करण्याचा इशारा शिक्षण विभागाला दिला होता.
वर्तमानपत्र pdf येथे पहा
👉👉PDF download
त्याच अनुषंगाने शिक्षण विभागाने जिल्हा परिषदमधील शिक्षकांचे एकूण १० कोटी ५० लाख रुपयांचे देयके अंतिम करून मंजूर केले आहेत. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या बँक खात्यात ही रक्कम पंधरा दिवसांत जमा होणार आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजाराने मान्यताप्राप्त दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेल्या रकमेची अदायगी शासनाकडून होत असते. हृदयविकार, कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांवर शिक्षक किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती स्वतः पैसे खर्च करून उपचार घेत असतात. या खर्च झालेल्या उपचार रकमेची मान्यता घेतल्यानंतर ही देयके संबंधित कर्मचाऱ्याला वैद्यकीय प्रतिकृती देयके म्हणून अदा केली जातात. सदर वैद्यकीय प्रतिकृतीदेखील चार वर्षांपेक्षा अधिक कालावधीत प्रलंबित होती. त्यामुळे आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत होता. प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ही वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढण्यासाठी फटाके फोडो आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाला गांभीर्याने घेऊन शालेय शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत केली ही देयके निकाली काढण्याची हमी दिल्यामुळे संघटनेकडून आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
शालार्थ टीमचे कौतुकास्पद कार्य
• चार वर्षापासून प्रलंबित असलेले वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके शोधण्यापासून ते चेक करणे, यादी तयार करून प्रसिद्ध करणे, देयके ऑनलाइन करणे, बिल मंजुरी आदेश स्कॅन करून प्रिंट काढणे, जिल्हा स्तरावर ऑनलाइन बिल जमा करणे आदी सर्व कामे २६ दिवसांत दिवस शालार्थ टीमने निकाली काढली.
• याबद्दल शालार्थ टीमसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, शिक्षणाधिकारी आदींचे प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राजगुरु व इतर पदाधिकारी, सदस्यांनी कौतुक केले.
उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला ही देयके निकाली निघाल्यामुळे आर्थिक मदत होईल. अशी देयके प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित राहणे योग्य होणार नाही.
-मुकुंद स्वरात, जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना