मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ राबविणेबाचत mazi shala sundar shala tappa-2 timetable 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-२ राबविणेबाचत mazi shala sundar shala tappa-2 timetable 

संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एसडी-६, दिनांक २६ जुलै, २०२४

२. या कार्यालयाचे सम क्रमांक जा.क्र. ४६४०, दिनांक २१/०७/२०२४

विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा २” हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.

२/- सदर अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असून शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत शाळांकडून विविध उत्तोमोत्तम उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शिक्षक व विदयार्थी यांच्यामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत आहे. या सर्व बाबींचा होणारा सकारात्मक परिणाम विचारात घेऊन या अभियानामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा यासाठी शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरुन त्याचे मूल्यांकन करणेसाठी पुढीलप्रमाणे नव्याने वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.

सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक :

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०२/०९/२०२४

ब) केंद्रस्तर : दि.१०/०८/२०२४ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०६/०९/२०२४ शुक्रवार सायं. ०५.०० वा. पर्यंत क) तालुका: दि.१५/०८/२०२४ गुरुवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.०८/०९/२०२४ रविवार सायं. ०५.०० वा. पर्यंत

ड) जिल्हा : दि.२०/०८/२०२४ मंगळवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४

बुधवार सायं.०५.०० वा. पर्यंत ३) मनपा दि.२०/०८/२०२४ मंगळवार (युआरसी पातळीवरुन अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दि.११/०९/२०२४ बुधवार सायं,०५,०० वा. पर्यंत

ई) विभाग दि.२५/०८/२०२४ रविवार ते दि.१५/०९/२०२४ रविवार सायं. ०५.०० वा. पर्यंत उ) राज्य दि.३०/०८/२०२४ शुक्रवार ते दि. १९/०९/२०२४ गुरुवार सायं.०५.०० वा. पर्यंत

Leave a Comment