सर्वेक्षणास दि.02/02/2024 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत maratha aarakshan sarvekshan
महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण दि.३१.१.२०२४ पर्यंत पूर्ण करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते.
राज्य मागासवर्ग आयोगाचे पत्र येथे पहा 👉👉pdf download
तथापि काही ठिकाणी हे सर्वेक्षण ३१.१.२०२४ पर्यत पूर्ण होऊ शकत नसल्याने सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे निदर्शनास आले आहे. यास्तव सर्वेक्षणास दिनांक २.२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आपल्या जिल्हा / महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचे काम दि.२.२.२०२४ पर्यंत १००% पूर्ण करावे व दि.३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत आपल्या क्षेत्रातील सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगास पाठविण्यात यावे ही विनंती.