आधी मराठा आरक्षणाचा सर्व्हे मग शाळा तहसीलदारांचे शिक्षकांना निर्देश; ‘कामबंद’मुळे अंगणवाडी सेविकांवर नाही जबाबदारी maratha aarakshan sarvekshan
सोलापूर, ता. २१ : आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने २३ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्य सरकारतर्फे घरोघरी जाऊन सव्हें केला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने त्यांना वगळून सर्व्हेची जबाबदारी जिल्हा परिषदेसह माध्यमिक शिक्षक, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवकांवर सोपविली आहे. आधी सर्व्हे मगच शाळा, असे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत.
शैक्षणिक बातमी येथे पहा
👉PDF download
मराठा समाजाच्या अनुषंगाने राज्य सरकारने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली असून मराठ्यांचे आरक्षण टिकावे, यासाठी न्यायमूर्ती गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटींची पूर्तता सव्र्व्हेच्या माध्यमातून केला जात आहे. दरम्यान, राज्यात आढळलेल्या ५४ लाख मराठ्यांना कुणबीचे जात प्रमाणपत्र ग्राये या मागणोबर मनोज जरांगे ठाम
आहेत. त्यांनी असंख्य मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच केली आहे.
सरकारने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शिक्षकांना प्रत्येकी ५०० घरांच्या सहेंची जबाबदारी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात त्यासाठी साडेसहा हजार सव्र्व्हेक्षक व साडेचारशे पर्यवेक्षक नेमाले आहेत. त्यात नऊशेजण राखीव आहेत.
कुटुंबातील कर्ता मुंबईला, तरी सव्हें होणार
• मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानाकडे निघाले आहेत. २६ जानेवारीला ते त्याठिकाणी पोचणार आहेत, त्याच दरम्यान गावोगावी मराठा आरक्षणाचा सर्व्हे सुरू होणार आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबातील लोक सर्व्हेची माहिती देणार आहेत. सव्र्व्हेत दिलेल्या माहितीची पडताळणी होणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचा सव्र्व्हे नाही
• मराठा आरक्षणाच्या सर्वोत १५४ प्रश्न असून सुरवातीला प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आरक्षणाचा लाभ घेता का, असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ‘हो’ असे दिल्यास पुढील सर्व्हे आपोआप पूर्ण होणार आहे. अॅपद्वारे आरक्षणाचा लाभ न घेणाऱ्या कुटुंबाचीच माहिती घेतली जाणार आहे. केवळ मराठा समाजाचीच नव्हे तर गावातील प्रत्येक कुटुंबाचा सव्हें यावेळी होणार आहे. कृषी सहायक व गटविकास अधिकान्यांवर सव्हेंचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी आहे.
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार २३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग
आयोगाच्या आदेशानुसार मराठा समाज
व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण
करण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक
यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात सूचना
देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने
नागरिकांनी माहिती द्यावी: निखिल मोरे
सोलापूर महानगरपालिकेतील इंद्रभुवन मधील सेंट्रल हॉल येथे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर शहरातील मराठा समाज खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण याकाळात पूर्ण करण्यात येणार असून यासाठी गोखले इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक अश्विनी चव्हाण यांनी अॅप्लीकेशनच्या माध्यमातून नागरिकांची माहिती संपूर्ण भरण्यासाठी प्रशिक्षण दिले.
● या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी नेमले असून त्यांना मागासवर्गीय आयोगाच्या वतीने ओळखपत्र देण्यात येणार आहे. महापालिकेचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी आल्यानंतर नागरिकांनी आपली संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी केले.