जि.प.प्रा.शाळा कांबळेश्वरचे विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय परीक्षेत राज्य मेरीट यादीत अव्वल manthan state level 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
manthan state level 
manthan state level

जि.प.प्रा.शाळा कांबळेश्वरचे विद्यार्थी मंथन राज्यस्तरीय परीक्षेत राज्य मेरीट यादीत अव्वल manthan state level
मंथन वेलफेअर manthan state level फौंडेशन अहमदनगर मार्फत २०२३ – २४ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा राज्यात मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थी पालक शिक्षक यांचा सत्कार समारंभ अहमदगर येथे संपन्न झाला .सदर परीसेत कांबळेश्वर शाळेच्या इ. १ ली मधील देवराज खलाटे याने २४४ गुण मिळवून राज्य मेरीट यादीत ४था क्रं .प्राप्त केलेबद्दल त्याच्या बरोबर त्याचीआई सौ गौरी खलाटे वडील श्री उदय खलाटे वर्गशिक्षक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी सत्कार स्विकारला तसेच अद्वय घोरपडे याने २४२ गुण मिळवून राज्यात ५ वा इ २ री मधील श्रीतेज चव्हाण २४२ गुण मिळवून राज्यात ५ वा . गुण मिळवले बद्दल यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन अहमदनगर येथे झालेल्या कौतुक सोहळ्यात गौरविण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा दिनकर टेमकर -मा . शिक्षण संचालक प्राथमिक पुणे, प्रमुख पाहुण मा अभिजित पठारे – अति जिल्हाधिकारी मणिपूर, मा अतुर चोरमारे – उपजिल्हाधिकारी (महसूल) अहमदनगर, मा . संदिप सांगळे – मराठी भाषा अध्यक्ष पुणे, मा सुधिर फाकटकर – विज्ञान लेखक . मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे, सूर नवा ध्यास नवा बालकलाकार – हर्षद नायबळ, मा आशिष धायतोंडे जी वाय .एस . पी, मा वैभव पडवळ – निबंधक पुणे, डॉ भूषण निकम एमडी या मान्यवंरांच्या हस्ते विद्यार्थ्यां चा गुणगौरव करण्यात आला .


राज्यस्तरीय मेरीट जिल्हा व केंद्रस्तरांवर कांबळेश्वर शाळेचेअव्वल ठरलेले विद्यार्थी –
१ ली – देवराज खलाटे – १४४ राज्यात ४ था अद्वय घोरपडे – १४२, राज्यात ५ वा स्माईली घोरपडे १३ ८, आदित्य कुंभार १३६, खुशी धोत्रे -१३४, आल्फिया शेख १२८, श्वेता वाघमारे १२८, शरण्या तांबे – १२८ इ .२ री – श्रीतेज चव्हाण – १४२ राज्यात ५ वा, विराज उकिरडे १२२, वेदांत जगताप -११८, अथर्व धोत्रे ११ ४
इ. ३री – अंकिता वाघमारे – २६२, श्रेया नरुटे -२ ३२, अन्वेष चव्हाण -२३०
इ. ४थी – दिव्या वाघमारे २६८, प्रियदर्शनी शिंदे – २६०, आराध्या गायकवाड – २५०
वरील विद्यार्था बरोबर शाळेतील १०८ पटापैकी ७६ विद्यार्थी सहभागी झाले होते शाळेचा निकाल १००% लागला असून सदर विद्यार्थी तयारी करून घेण्याचे काम वर्षभर शाळेचे मुख्याध्यापक श्री . ज्ञानदेव सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक श्री . रेवणनाथ सर्जे , उपशिक्षिका सौ . सुनिता शिंदे , सौ . मनिषा चव्हाण या सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळे शाळेचे विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले असून विद्यार्थी, पालक, माता पालक, वर्षभर तज्ञ मार्गदर्शक नेमून नियोजनबध्द गुणवत्ता वाढ उपक्रमास शाळेने झोकून देऊन काम केल्यामुळे हे यश मिळाले असून वर्षभर शाळेच्या नियोजनातून पालक मागणीवरून मंथन, Itse, ऑलिम्पियाड, MTS, BTS, डायमंड अशा विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थांना बसवून तयारी करून घेण्याचे काम प्रामाणिकपणे माता पालकांना विश्वासात घेऊन शाळेच्या वतीने करण्यात येत

असून भविष्यकालीन स्पर्धा परीक्षा बेसिक तयारी यामध्ये प्रामुख्याने शिष्यवृत्ती जवाहर नवोदय सैनिक स्कूल बेसिक तयारी शाळेच्या वतीने करण्यात येते . याचाच परिपाक म्हणून २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात शाळेच्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थी शैक्षणिक सर्वांगिण विकासासाठी विद्यार्थी हितासाठी शाळा राबत असल्यामुळे चालू वर्षात जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास पालकांत दृढ झाला असून खाजगी इंग्रजी माध्यमातून शाळेत विद्यार्थी दाखल होत असल्याचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानदेव सस्ते यांनी सांगितले . चालू शैक्षणिक वर्षात शाळेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा तयारी वर्गा बरोबर विविध बुद्धीमत्ता वाढीसाठी अबॅकस , इंग्रजी सुधार अंतर्गत – स्पोकन इंग्रजी, खेळ कला , क्रीडा , सांस्कृतिक , बालसंस्कार वर्ग अशा विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन पालक सहभागातून करण्यात येणार आहे . त्यामुळे जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षण हे मोफत आणि गुणवत्ता पूर्ण देण्याचे कामाचे नियोजन शाळेतील सर्व शिक्षकांनी केले असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जिल्हा परिषद शाळेचे उपक्रम पोहचवण्यासाठी व जिल्हा परिषद कांबळेश्वर शाळेत प्रवेश घेऊन आपल्या पाल्याच्या करिअर, स्पर्धा परीक्षा तयारी बाबत शाळेच्या वतीन प्रबोधन करून एप्रिल महिन्यात गृहभेटी देऊन शाळेमध्ये ३० प्रवेश निश्चित केले आहेत


मंथन वेल्फेअर फौंडेशन अहमदनगर यांच्या वतीने विद्यार्थां गुणगौरव सोहळा संपन्न झाला विद्यार्थांन तारांगण, विज्ञान जागृती साठी विविध प्रयोग, रोबोट, सेल्फी पाँईट , तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या मुलांना विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले त्यांच्या तयारी मध्ये लहान वर्गापासून मंथन बरोबरच इतर विविध स्पर्धा परीक्षा प्राथमिक स्तरावर दिल्यामुळेच त्यांना यश मिळाल्याचे या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे बाळकडू राज्यस्तरीय मेरीट मध्ये अव्वल आलेल्या मुलांना त्यांनी दिले .
शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल पालक ग्रामस्थ यांनी कौतुक केले. पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा श्री . संपतराव गावडे साहेब , विस्तार अधिकारी श्री . संजय जाधव साहेब , शिरवली केंद्राच्या आदर्श केंद्रप्रमुख सौ. शोभा सावंत या सर्वांनी विद्यार्थी शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

Leave a Comment