सुधारित वेळापत्रक महावाचन उत्सव-२०२४ उपक्रम राबविण्याबाबत mahavachan sudharit timetable
संदर्भ:- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. २१७/ एसडी-४ दि. १६/०७/२०२४.
२) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/STARS/म.वा.उ./२०२४-२५/२४६१ दि. १६/०८/२०२४.
महावाचन उत्सव २०२४ मध्ये आज अखेर २६,०६,२११ विदयार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सहभागी विदयार्थ्यांचे तसेच संबंधित सर्व शिक्षक, कर्मचारी, अधिकारी, यांचे हार्दिक अभिनंदन!
उपरोक्त संदर्भिय क्र. १ अन्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव – २०२४’ हा उपक्रम राबविण्याबाबत शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महावाचन उत्सव २०२४ च्या मार्गदर्शक सूचना या कार्यालयाने दि. १६/०८/२०२४ रोजीच्या पत्रान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत.
संदर्भीय पत्र क्र. २ च्या मार्गदर्शक सूचनांन्वये दिनांक ०५ ऑगस्ट, २०२४ ते दि. ३१ ऑगस्ट, २०२४ या कालावधीत ‘महावाचन उत्सव-२०२४’ हा उपक्रम राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबविण्याबाबत आपणांस कळविण्यात आले होते. या मार्गदर्शक सूचनांनुसार https://mahavachanutsav.org प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली तसेच या प्रणालीत शाळास्तरावरुन माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन याबाबत कळविण्यात आले आहे.
सुधारीत वेळापत्रक
सदर उपक्रमातील विदयार्थ्यांचा उत्साह व प्रतिसाद पहाता तसेच गणपत्ती उत्सवाच्या सुटटया यामुळे विदयार्थ्यांना आपले लेखन अपलोड करता आले नाही त्यामुळे विदयार्थी सहभाग घेण्यापासून वंचित राहू नये याकरिता सुधारित दिनांक २७/०९/२४ पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात येत आहे. तरी आपणांस विनंती की, या मुदत वाढीचा पुरेसा फायदा घ्यावा आणि आपल्या सर्व विदयार्थ्यांना त्यांचे आवडीचे पुस्तक वाचून अभिप्राय लेखन