महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकरिता सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत mahatma Jotiba fule health scheme
वाचा : १ )शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अर्थसं २०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि.१२.०४.२०२३
२) सार्वजनिक आरोग्य विभागाची नस्ती क्र. मफुयो-२०२३/प्र.क्र.१६९/आरोग्य-६
शासन निर्णय :-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मागणी क्र. एन-३, २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०१, नागरी आरोग्य सेवा- विषमचिकत्सा, ७८९, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, (०१) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (०१) (०३) महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (कार्यक्रम) लेखाशिर्ष २२१०जी८६१, ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) खाली रु.१४१,५७,३६,०००/- इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.
वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.१२.०४.२०२३ रोजीच्या शासन परीपत्रकान्वये केंद्र पुरस्कृत योजनांसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरीणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुषंगाने संदर्भाधीन क्र. २ च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नस्तीवरील प्रस्तावानुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अनुसूचित प्रवर्गाच्या लाभार्थ्यांसाठी माहे फेब्रुवारी ते मार्च २०२४ मधील विमा हप्त्याचे प्रदान करण्याकरिता लेखाशीर्ष २२१० जी ८६१ अंतर्गत रु. २१,३५,८८,६४२/- (अक्षरी रुपये एकवीस कोटी पस्तीस लाख अठ्ठयाऐंशी हजार सहाशे बेचाळीस फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.
२. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करुन दिलेलया तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी.
शासन निर्णय क्रमांकः बीजीटी-२०२३/प्र.क्र. ६१/अर्थसंकल्प (विघयो)
३. विभाग प्रमुख / नियंत्रक अधिकारी यांनी अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी त्याच घटकांवर खर्च होईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरुन शासनाला या योजनांवर होणाऱ्या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.
४ . सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करतांना विभागप्रमुख तसेच नियंत्रक
अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.१२.०४.२०२३ रोजीच्या शासन परीपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दि.१२.०४२०२३ रोजीच्या शासन परीपत्रकातील निर्णयान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०३२२११५८४४८५२२ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.
शासन निर्णय येथे पहा pdf download