MAHA-TET EXAM 2024 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला हॉल तिकीट लिंक येथे पहा mahatet exam hallticket link
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. तीन वर्षांनंतर होणाऱ्या परीक्षेला राज्यातून तीन लाख ५३ हजार ९३७ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ‘पेपर-१’ च्या तुलनेत ‘पेपर-२’ साठी परीक्षार्थीची संख्या मोठी आहे. परीक्षा निश्चित तारखेलाच होणार असल्याचे परिषदेकडून सांगण्यात येते. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिकचा आधार घेतला जाणार आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. १० नोव्हेंबरपर्यंत प्रवेशपत्र डॉउनलोड करता येणार आहे. पण सोमवारपासून परीक्षार्थी प्रवेशपत्र काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते डाउनलोड होत नाही.
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024
परिषदेतर्फे २०२४मध्ये घेण्यात येणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. विधानसभा निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखांबाबत चर्चा सुरू होती. मात्र, परीक्षा निश्चित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. प्राथमिक स्तरावर (पेपर-१) व माध्यमिक स्तरावर (पेपर-२) परीक्षा घेतली जाते. शिक्षक पदासाठी २०१३ पासून ‘टीईटी’ बंधनकारक करण्यात आली. ही ‘टीईटी’ आठवी असल्याचे सांगण्यात येते. मागील काही परीक्षा गैरप्रकारांमुळे चर्चेत राहिल्या. यानंतर परिषदेने होणाऱ्या परीक्षेत अनेक बदल केले आहेत. यामध्ये परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीसह विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदविली जाणार आहे. राज्यभरात साडेतीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत लिंक
👉👉पहिल्यांदा https://mahatet.in/ या वेबसाईटवर
जा.
त्यानंतर ‘लॉगिन’वर क्लिक करा. ‘उमेदवाराचे लॉगिन’ ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर परीक्षार्थी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करु शकेल.
पेपरचे वेळापत्रक येथे पहा
१० नोव्हेंबरला सकाळच्या सत्रात १०.३० ते ०१.०० दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ होणार आहे. त्यानंतर दीड तासांचा ब्रेक असणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ दुपारी ०२.३० ते ०५.०० पर्यंत होणार आहे.
परीक्षा साठी केंद्र
राज्यातील विविध शहरांमधून होणाऱ्या परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये १०२९ परीक्षा केंद्र असणार आहेत. यामध्ये ‘पेपर-१’ साठी एक लाख ५२ हजार ५९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ४३१ परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा होणार आहे. ‘पेपर-२’ दोनसाठी दोन लाख एक हजार ३४० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये गणित आणि विज्ञान विषयाचे ७५ हजार ५९७ परीक्षार्थी, तर सोशल सायन्सचे एक लाख २५ हजार ७४३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ५९८ केंद्रांवरून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा परिषदेने २०२१मध्ये घेतलेल्या ‘टीईटी’ परीक्षेच्या तलनेत २०२४मध्ये परीक्षार्थीची संख्या वाढली आहे
२०२१मध्ये तीन लाख तीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा मागील परीक्षेच्या तुलनेत परीक्षार्थीच्या संख्येत वाढ झाली आहे.