दांडीबहाद्दर ९५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज नोटीस’loksabha election training 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दांडीबहाद्दर ९५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज नोटीस’loksabha election training

लोकमत न्यूज नेटवर्क:अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त ९५४ अधिकारी- कर्मचाऱ्यांना पहिल्याच प्रशिक्षणाला दांडी मारणे अंगलट येणार आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासाच्या आत खुलासा मागविला आहे. :

निवडणुकीसाठी किमान १३ हजार मनुष्यबळ आवश्यक आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर मतदान प्रक्रियेचा डोलारा आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात एकाचवेळी २३ व २४ मार्च रोजी या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शिबिर पार पडले. त्यापूर्वी या सर्वांना निवडणूक कर्तव्याची नियुक्तिपत्रे पाठविण्यात आली व त्यामध्ये प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली होती. प्रत्यक्षात १३,३०९ पैकी १२,३५५ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थिती लावली. त्यामुळे पहिल्याच प्रशिक्षणाला तब्बल ९५४ जण गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशिक्षणाला अनुपस्थित या कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम अन्वये कारवाई का करण्यात येऊ नये, यासाठी संबंधित एआरओंद्वारा आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

१०५० कर्मचाऱ्यांना बळावले आजार

निवडणुकीशी संबंधित एकाच व्यक्तींना दोन आदेश असल्यास किंवा हृदयरोग किंवा गंभीर आजार असल्यास इलेक्शन ड्यूटी रद्दबाबत अर्जाचा विचार केला जातो. यावेळी जिल्ह्यात १०५० अधिकारी व कर्मचाऱ्याऱ्यांनी इलेक्शन ड्यूटी रद्द करण्या- बाबत विनंती अर्ज निवडणूक विभागाला प्राप्त झालेले आहेत. यापैकी बहुतेकांचे आजार या कालावधीत्त बळावले असल्याचे सांगण्यात आले.

निवडणूक अधिकारी- कर्मचारी यानी प्रशिक्षणाला उपस्थित राहणे अनिवार्य आहे, त्यामुळे अनुपस्थित असणाऱ्या सर्वांना संबंधित एआरओ यांच्याद्वारा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

– अनिल भटकर नोडल अधिकारी (मनुष्यबळ)

loksabha election training
loksabha election training

Leave a Comment