लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्रशिक्षण आयोजनाबबत loksabha election 2024
संदर्भ – मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजापूर यांचेकडील पत्र क्रमांक/निवडणूक/लो.सा.नि.2024/प्रशिक्षण/ दिनांक- 23/02/2024
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने संदर्भिय पत्रान्वये आगामी लोकसभा निवडणूक 2024 व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिनांक 29/02/2024 रोजी 11.00 वाजता नगर परिषद नाट्यगृह राजापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर प्रशिक्षण बैठक आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याने अनुपस्थित राहिल्यास संबंधित विरुध्द लोकप्रतिनिधी अधिनियम, 1950 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल), नियम 1979 अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तरी सदर बैठकीसाठी आपण सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे.