गुरुजी शाळेतच थांबा,पोरांना शिकवा,पत्र ई-मेलवर पाठवा : सीईओंचे आदेश: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार letter on email 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुरुजी शाळेतच थांबा,पोरांना शिकवा,पत्र ई-मेलवर पाठवा : सीईओंचे आदेश: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार letter on email 

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा, जि. प. माध्यमिक शाळा, गटशिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी (प्रा.) कार्यालय यांच्यामध्ये होणारा पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी १८ जून रोजी दिले आहेत. यामुळे शिक्षकांना शाळा सोडता येणार नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा पत्र व्यवहार केंद्रीय प्राथमिक शाळेला करतात व तेथून हा पत्र व्यवहार गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला होतो. पत्र व्यवहार

करण्यासाठी अनेकदा कार्यालयीन कर्मचारी अथवा परिचर उपलब्ध नसल्याने कार्यरत असणारे शिक्षक या पत्रव्यवहारासाठी मुख्यालय सोडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. अनेकदा अशी कारणे दाखवून विनाकारण मुख्यालय सोडून दांडी मारतात. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यातील सर्व पत्र व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून

करण्याचे निर्देशित दिले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या २४१७ प्राथमिक, १६४ केंद्रीय, तर ५९ माध्यमिक अशा एकूण एकूण शाळा २४७६ आहेत.

ई-ऑफिसपर्यंत

तात्पुरती व्यवस्था

राज्य शासनाच्या ग्रामविकास

विभागामार्फत ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या कार्यवाहीसाठी ई-मेल आयडी तयार

करणे, सदर ई-मेल आयडी शासनाच्या डोमेनवर तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे ही प्राथमिक जबाबदारी आहे.

शाळास्तरापर्यंत ही कार्यवाही १८० दिवसांत करण्याचे निर्देश तिन्ही शिक्षणाधिकारी व

गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कार्यवाही होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून पत्र व्यवहार

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्याचे सुचविले आहे.

व्हॉटसअॅप, फेसबुक, टेलिग्राम टाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा,

१ माध्यमिक शाळा व गटशिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालयांनी ठराविक पॅटर्नमध्ये जीमेलवर ई-मेल आयडी तयार करावा. तो करताना भ्रमणध्वनी क्रमांक केंद्रीय मुख्याध्यापक किंवा प्राथमिक शाळेतील वरिष्ठ शिक्षकांचा असावा.

२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून केंद्रीय प्राथमिक शाळेत होणारा पत्रव्यवहार व केंद्रीय प्राथमिक शाळेतून गटशिक्षणाधिकारी यांना

होणारा पत्रव्यवहार पीडीएफ स्वरूपात करावा.

३ पत्रव्यवहारासाठी व्हॉटसअॅप, फेसबुक, टेलिग्राम, अशा समाज माध्यमांचा वापर बहुतांश टाळण्यात यावा. अति अपरिहार्य

परिस्थितीमध्ये या समाज माध्यमांचा वापर करून पत्रव्यवहार करण्यात आला तर अशाप्रती पुन्हा २४ तासांत ई-मेलवर सर्क्युलेट कराव्यात.

४ यापुढे पत्रव्यवहार दाखल करणे या कामासाठी कोणत्याही

अशा जबाबदारी देण्यात येऊ नये किंवा अशा कारणासाठी शिक्षकांनी मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरहजेरी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे सीईओंनी आदेशात म्हटले आहे.

letter on email 
letter on email

Leave a Comment