सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच अग्रीम अदा करण्यासाठी वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियम / शर्ती यांचा अवलंब करून निधीचे खर्च करण्यात यावेत लेखाशिर्श सन 2023-24 lekhashirsh
अनुदान व लेखाशिर्श 30/10/2023 चा शासन निर्णय येथे पहा 👇👇👇
https://drive.google.com/file/d/1AsN7LUizbsTilxcZOcv0jM0r4xGYHuuJ/view?usp=drivesdk
शासन निर्णय महत्त्वाचे update
state employee todays GR ] : राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर महिन्याच्या वेतन देयक अदा करणे संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून निधी वितरण करणे संदर्भात दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी दिलासादायक ,महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीत वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी , नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा , महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई , यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .
यानुसार आता सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पीत झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे . सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच अग्रीम अदा करण्यासाठी वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले नियम / शर्ती यांचा अवलंब करून निधीचे खर्च करण्यात यावेत , असे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयामध्ये लेखा शीर्ष निहाय वितरित करण्यात आलेल्या निधी पुढील प्रमाणे पाहू शकता
सदर निधीमधून लेखाशिर्ष निहाय नमूद कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच अग्रीम तसेच इतर नमूद लेखाशीर्ष व निधीचे खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दि.30.10.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउन लोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..