अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता ६ ते ८ च्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत learning outcomes training 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता ६ ते ८ च्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत learning outcomes training 

संदर्भ: १. समग्र शिक्षा अंमलबजावणी समितीची बैठक दि.२४.०४.२०२३

२. STARS प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त दि.०३.०५.२०२३

३. कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त दि.०७.०६.२०२३

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्र. १ व २ नुसार समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रि व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शा आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना द्यायचे अ त्यानुषंगाने विभागस्तर प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षण कालावधी एकूण ०५ दिवस होता त्यामध्ये ४ दिवस अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व १ दिवस सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमा प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी विभागीय डायट प्राचार्य यांची होती.

उपरोक्तनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्य येत असून आयोजनाची जबाबदारी संबंधित डायट प्राचार्य यांची राहील. सदर प्रशिक्षणाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत १. पहिला टप्पा दि. १६ ते २० जानेवारी २०२४

२. दुसरा टप्पा दि. ३० जानेवारी २०२४ ते ०३ फेब्रुवारी २०२४

सदर तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रती व्यक्ती (प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ) प्रती दिन रक्कम रु. १५०/- प्रमाणे निधी मर्यादेत खर्च करावा.

खर्चाच्या बाबी व निकष खालील प्रमाणे

१. मानधन – रु. ४०० प्रती दिन (फक्त तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी)

२. प्रशिक्षण वर्ग/Hall

३. इंटरनेट सुविधा

४. भोजन व्यवस्था (Working Lunch)

५. स्टेशनरी व किरकोळ खर्च

६. तज्ज्ञ मार्गदर्शक TA एकदा (एकदा जाणे व येणे)

Leave a Comment