अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? learning outcomes

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? learning outcomes

 

Learning outcomes अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन

अध्ययन निष्पत्ती :

• अध्ययन निष्पत्ती ही संकल्पना स्पष्ट करतात.

• दैनंदिन अध्ययन-अध्यापनात अध्ययन निष्पत्तीची गरज आणि महत्त्व सांगतात.

• अध्ययन निष्पत्ती, अध्ययन अनुभव व मूल्यमापन यांचा परस्पर संबंध सांगतात.

• अध्ययन निष्पत्तीनुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन साधनतंत्राचा वापर करतात.

• अध्ययन निष्पत्तीनुसार आकारिक मूल्यमापनातील इतर साधनांचा वापर करतात.

प्रस्तावना :

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी २०१७ मध्ये अध्ययन निष्पत्ती निश्चित करून प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक इयत्तेच्या विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती तयार करण्यात आल्या आहेत. विदयार्थ्यांनी वर्षभरात काय साध्य करायचे आहे, या संदर्भातील विधाने अध्ययन निष्पत्तीच्या रूपाने दिसून येतात. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अपेक्षित अध्ययन निष्पत्तींच्या संदर्भात इयत्तानिहाय त्याच्या अध्ययनाचे मूल्यमापन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? :

अध्ययनास उपयुक्त प्रक्रियांच्या आधारे अध्ययन घडून आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे अपेक्षित बदल म्हणजे अध्ययन निष्पत्ती (Learning Outcome) होय.

अध्ययन निष्पत्तीची गरज :

• अध्ययन निष्पत्तीमुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेस सुयोग्य दिशा मिळते.

• विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कोणते अध्ययन अनुभव दयायचे हे निश्चित करता येते.

• इयत्ता, विषय व घटकनिहाय अध्यापन पद्धती निश्चित करता येते.

• अध्ययन निष्पत्तींच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यास योग्य दिशा मिळते.

अध्ययन निष्पत्ती : संदर्भ

१) बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ साठी महाराष्ट्र शासनाने ११ ऑक्टोबर, २०११ रोजी महाराष्ट्र बालकाचा व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ राज्य नियमावली प्रसिद्ध केली. त्यात भाग ७ मधील कलम २२ (३) मध्ये पुढीलप्रमाणे तरतूद केली आहे :

‘विदयाविषयक प्राधिकरण अभ्यासक्रम आणि मूल्यमापन कार्यपद्धती विहित करेल. हे प्राधिकरण प्रत्येक वर्गासाठी अध्ययन फलनिष्पत्ती (अध्ययन निष्पत्ती) विहित करेल.’

२) बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अंतर्गत केंद्र शासनाने तयार केलेले नियम २०१० अंतर्गत २० फेब्रुवारी, २०१७ रोजीच्या अधिसूचनेद्वारे सुधारणा करण्यात येऊन नियम २३ (२) खंड (ग) च्या ठिकाणी पुढीलप्रमाणे तरतूद केली.

(ग) इयत्ता व विषयनिहाय प्राथमिक शिक्षणाच्या सर्व इयत्तांसाठी अध्ययन निष्पत्ती तयार करणे.

(घ) अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना तयार करणे.

३) बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी, त्याची अध्ययनातील प्रगती पाहण्यासाठी निकषांची गरज होती यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे मार्फत इयत्तानिहाय प्रत्येक विषयासाठी अध्ययन निष्पत्ती तयार करण्यात आल्या. प्राथमिक, उच्च प्राथमिक स्तरांतील इयत्ता व विषयनिहाय पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि अध्ययन निष्पत्ती :

अध्ययन निष्पत्ती साध्यतेतील उणिवा भरून काढण्यासाठी वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ही क्षमताधिष्ठित असेल. मूल्यमापन साधने जसे की- अध्ययनासाठी मूल्यमापन, अध्ययन हेच मूल्यमापन, अध्ययनाचे मूल्यमापन हे प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक विषयाच्या अध्ययन निष्पत्ती, क्षमता आणि रचना यांच्याशी संलग्न केल्या जातील. असे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये नमूद केले आहे.

अध्ययन निष्पत्ती, अध्ययन अनुभव व मूल्यमापन यांचा परस्परसंबंध :

अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा भाग अध्ययनाने व्यापलेला आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या रचनेचा आणि वर्तनाचा अध्ययन हा आधार आहे. जन्मापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अध्ययन अनुभव हे व्यक्तीच्या वर्तनास आकार देण्यास किंवा वर्तन बदलास कारणीभूत ठरत असतात. बालक जन्मापासून त्याच्या सभोवतालच्या वातावरणातून असे अनुभव घेत असते. अध्ययन अनुभवातून बालक परिस्थिती, घटना इत्यादींशी संबंधित निष्कर्ष काढत असते आणि त्यानुसार त्याच्या वर्तनात बदल करत असते. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अध्ययन अनुभवाच्या आधारे वर्तनात जो बदल घडून येतो त्यालाच अध्ययन असे संबोधले जाते.

शाळेसारख्या औपचारिक वातावरणात उ‌द्दिष्टे समोर ठेवून दिले जाणारे अध्ययन अनुभव बालकाच्या शिकण्यास मदत करतात. म्हणजेच बालकांचे शिकण हे हेतुपूरक व ध्येयाधिष्ठित असते. बालकांचे अध्ययन ही एक मूलभूत आणि जीवनभर चालणारी प्रक्रिया असते. बालकांनी आत्मसात केलेली कौशल्ये, मिळवलेले ज्ञान, दृष्टिकोन इत्यादी अध्ययनाचे परिणाम असतात.

शालेय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बालकात कोणते बदल किंवा परिणाम अपेक्षित आहेत यालाच ‘अध्ययन निष्पत्ती’ म्हणतात. बालकांनी अध्ययन निष्पत्ती साध्य कराव्यात यासाठी शिक्षक अध्ययन अनुभवांची रचना करतात, अध्ययनास आवश्यक अशा अध्ययन वातावरणाची निर्मिती करतात या प्रक्रियेला ‘अध्यापन’ असे म्हणतात. अध्यापनकार्याचा मुख्य उद्देश बालकाच्या अध्ययनासाठी अध्ययन समृद्ध वातावरण निर्मिती करणे व बालकांनी आपली बलस्थाने ओळखून क्षमता विकसित कराव्यात यासाठी मदत करणे हा आहे. ‘शिकावे कसे’ हे शिकवणे हा अध्यापनाचा गाभा आहे.

अध्ययन-अध्यापन प्रक्रियेनंतर अथवा प्रक्रिया सुरू असताना निश्चित केलेली उ‌द्दिष्टे बालकांसाठी इयत्ता व विषयनिहाय निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य झाल्या हे पाहण्यासाठी मूल्यमापनाची गरज असते. अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन या सोबत चालणाऱ्या व परस्परपूरक प्रक्रिया आहेत. मूल्यांकनातून बालकांमध्ये अंतर्भूत असलेल्या क्षमता व प्राप्त करावयाच्या क्षमता संपादनात येणाऱ्या अडचणी माहीत होतात. त्यामुळे शिक्षकांना बालकास अनुरूप मदत करता येते. मूल्यमापन हे बालकाच्या अध्ययनास गती देण्याचे काम करते. मूल्यमापनाच्या आधारे अध्ययन अनुभव, अध्ययन-अध्यापनाच्या पद्धतीत योग्य ते बदल करता येतात. अध्ययन निष्पत्ती आधारित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना योग्य त्या साधनतंत्राची निवड करता येते. +

कृती (Action)

पुनर्विलोकन / आढावा

नियोजन (Planning)

अध्ययन निष्पत्ती

अध्ययन निष्पत्ती आधारित मूल्यांकन

अध्ययन अध्यापन

पडताळा (Check)

अंमलबजावणी (Do)

वरील चक्र हे मूल्यमापन प्रक्रिया ही चार वेगवेगळ्या; परंतु परस्परपूरक घटकांवर आधारलेली आहे हे दर्शविते. नियोजन (Planning), अंमलबजावणी (Do), पडताळा (Check), कृती (Action) हे मूल्यमापन प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत.

बालकांनी काय शिकावे? बालकांना शिकण्यासाठी कोणते अध्ययन अनुभव दयावेत? ज्या निष्पत्ती निश्चित केल्या होत्या त्या साध्य झाल्या का? अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी कोणते बदल या प्रक्रियेत करावे लागतील? हे प्रश्न मूल्यमापन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे हे दर्शवितात.

अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्यमापन :

इयत्ता व विषयनिहाय निर्धारित अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्या आहेत किंवा कसे हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. तथापि अध्ययन निष्पत्ती साध्यतेसाठी विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देणे आवश्यक आहे. हे अध्ययन अनुभव देताना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या साधनतंत्रांचा विचार करता येईल. आपण

ज्या साधनतंत्रांचा उपयोग अध्ययन अनुभवासाठी केला आहे त्या साधनतंत्राच्या मूल्यमापनासाठी निश्चित केलेल्या निकषांचा विचार करण्यात यावा.

अध्ययन निष्पत्ती – साधनतंत्रे :

राष्ट्रीय शिक्षण धोरण १९८६ नुसार विदयार्थ्यांसाठी वाढ आणि विकासामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील मूल्यमापन हा अविभाज्य घटक असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यात दि. २० ऑगस्ट, २०१० च्या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षणात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाला सुरुवात झाली. यामध्ये मूल्यमापनाची आठ साधने निश्चित केली आहेत. विविध शैक्षणिक प्रक्रियेत प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने साधनतंत्रे वापरून सर्व शिक्षक मूल्यमापन करत आहेत. सदयः स्थितीत मूल्यमापन करताना अध्ययन निष्पत्तींचा विचार मध्यवर्ती ठेवून विदयार्थ्यांचे समग्र मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला आहे. शिक्षकांसोबत विदयार्थ्यांचे स्वयंमूल्यमापन, सहाध्यायी मूल्यमापन व पालकांद्वारे मूल्यमापनाचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांचा विचार करता विदयार्थ्यांचा समग्र विकास व अध्ययन निष्पत्तीच्या साध्यतेसाठी, अध्ययन अध्यापनाच्या परिणामकारकतेसाठी तसेच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अधिक समृद्धतेने व्हावे व परिणाम साधता यावा यासाठी प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या साधनतंत्रात व त्यांच्या वापरात विविधता आणणे आवश्यक आहे.

अध्ययन निष्पत्ती आणि मूल्यमापनात साधनतंत्राचा एकात्मिक वापर :

महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यावेळी अभ्यासक्रमाची उद्दिष्टे लक्षात घेऊन मूल्यमापन साधनतंत्राचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षक मार्गदर्शिका भाग १ ते ४ मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

NCERT च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी शिक्षकांनी वर्गात व वर्गाबाहेर अध्ययन अनुभवांची रचना व निर्मिती करून विद्यार्थ्यांना अध्ययनपूरक वातावरण निर्माण करणे अभिप्रेत आहे. यासाठीच पाठ्यपुस्तक व त्यातील आशय, सहशालेय कार्यक्रम, विविध स्पर्धा यांचा समावेश करण्याच्या

सूचना देण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात प्रत्येक विदयार्थ्याच्या संबंधित इयत्तेतील विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती साध्य करणे महत्त्वाचे आहे. या अध्ययन निष्पत्ती सोबतच जीवन कौशल्ये, एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये, गाभा घटक, मूल्ये यांचा ही समावेश अध्ययन अनुभव देताना व मूल्यमापन करताना करणे आवश्यक आहे. आकारिक मूल्यमापन हे नियमित चालणारी प्रक्रिया आहे. शिवाय ही साधने केवळ मूल्यमापन साधने नसून ती अध्ययन-अध्यापनाची साधने आहेत. कोणतेही मूल्यमापन साधन वापरताना त्याचा आवश्यक व पुरेसा सराब विदयार्थ्यांना देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे ही सर्व मूल्यमापनाची साधने सुरुवातीला अध्ययन-अध्यापनाची साधने म्हणून वापरणे अनिवार्य आहे.

अध्ययन निष्पत्तीनिहाय मूल्यमापन साधनतंत्राचा वापर करताना शिक्षकांनी पुढील पायऱ्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

१) अध्ययन निष्पत्तीचे मापन: संबंधित इयत्तेच्या, विषयाच्या अध्ययन निष्पत्तीचे पाठ्य घटकातील

आशयासोबत मापन करणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक अध्ययन निष्पत्ती संदर्भात पाठ्यपुस्तकात किती व कोणते घटक आहेत. संबंधित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी कोणत्या सत्रात संधी

आहेत. कोणत्या अध्ययन निष्पत्तीसाठी अवांतर, पाठ्यपुस्तकाबाहेरचे अध्ययन अनुभव देणे गरजेचे

आहे हे लक्षात येईल. या उलट आपण केवळ पाठ्य घटकांच्या अनुषंगाने अध्ययन निष्पत्तीचा विचार

केला तर, काही अध्ययन निष्पत्ती दुर्लक्षित होतील.

२ ) अध्ययन अनुभवांची योजना : अध्ययन निष्पत्तीनिहाय अध्ययन अनुभवांची योजना करताना वर्गातील

वेगवेगळ्या अध्ययन शैलीनुसार अनुभवांची रचना करणे आवश्यक आहे. ‘गार्डनर’ यांच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या प्रकारांनुसार अध्ययन अनुभवांची रचना करण्याकडे शिक्षकांनी लक्ष दयावे असे म्हटले आहे. या पद्धतीने अध्ययन अनुभवांची रचना अथवा योजना केल्यास वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षक खऱ्या अर्थाने पोहोचू शकेल. .

३) अध्ययन अनुभव व मूल्यमापन साधनांची सांगड अध्ययन अनुभव देत असताना अध्ययन निष्पत्ती

साध्य करण्यासाठी ज्या प्रकारचा अध्ययन अनुभव देत आहोत त्यासाठी योग्य मूल्यमापनाची साधनतंत्रे शिक्षकांनी निवडणे अभिप्रेत आहे. उदा. विदयार्थ्याने बालवाचन साहित्यावर अभिव्यक्त होण्याची अपेक्षा अध्ययन निष्पत्तीमध्ये दर्शविली असेल, तर विद्यार्थ्याला बालवाचन साहित्य वाचण्यासाठी विविध संधी निर्माण करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गटात, वर्गापुढे तोंडी अथवा लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी त्याचे मत व्यक्त करण्याची संधी देणे आवश्यक आहे. पुरेशा संधी दिल्यानंतर शिक्षक योग्य त्या साधनतंत्रांची निवड मूल्यमापनासाठी करू शकतात.

४) मूल्यमापन साधनतंत्राचे उपयोजन : मूल्यमापन साधनतंत्रांची निवड केल्यानंतर त्या साधनतंत्रांच्या

माध्यमातून आपण कार्यमापन करणार आहोत हे निश्चित करणे आवश्यक आहे. मूल्यमापनाचा उद्देश लक्षात घेऊन साधनतंत्र निश्चित करावे. उदाहरणार्थ, विदयार्थ्याला गुणाकार करता येतो की, नाही एवढेच पाहणे आवश्यक असेल, तर या निकषाचे केवळ होय किंवा नाही या स्वरूपात उत्तर अपेक्षित आहे. म्हणजेच अशा वेळी शिक्षक निवडलेले निकष विदयार्थ्याने प्राप्त केले आहेत अथवा नाही याचा पडताळा घेऊ इच्छित आहेत. अशा वेळी पडताळा सूची या तंत्राचा वापर केल्यास अधिक समर्पक होईल.

अध्ययन निष्पत्तीनुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन साधनतंत्राचा वापर :

अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तक वापरणे अपेक्षित नाही. या सर्व अध्ययन निष्पत्ती केवळ पाठ्यपुस्तकातील आशयातून साध्य होतील असेही नाही. संबंधित विषयाच्या ज्या अध्ययन निष्पत्ती या पाठ्य घटकातून साध्य होण्यास संधी नाही अशा वेळी शिक्षकांनी अध्ययन पूरक / सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून अथवा वर्गाबाहेर काही अध्ययन अनुभव योजून अध्ययन निष्पत्ती साध्य

करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यामुळे दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी अध्ययन निष्पत्ती व पाठ्य घटक यांचा ताळमेळ साधणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन साधनतंत्रांचा अध्ययन निष्पत्तीला अनुसरून कसा वापर करू शकू या बाबत समजून घेऊ या.

१) दैनंदिन निरीक्षण : वर्गातील विद्यार्थ्यांचे नियमितपणे आपण निरीक्षण करत असतो. दैनंदिन निरीक्षणातून विदयार्थ्यांच्या काही चांगल्या-वाईट सवयी, गुणवैशिष्ट्ये, जीवनकौशल्ये, मूल्य, गाभाघटक, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षण नोंदी करणे अपेक्षित आहे.

तसेच निरीक्षणाचे आधारे त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादाची नोंद करणे अपेक्षित आहे.

२) तोंडी काम : तोंडी काम या मूल्यमापन साधनामध्ये विविध साधनतंत्रांचा समावेश होतो. जसे-

प्रश्नोत्तरे, प्रकटवाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी. विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी यांसारख्या मौखिक पद्धतीने विदयार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी देणारे अध्ययन अनुभव आपण वर्गामध्ये विदयार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. ज्या प्रकारचे अध्ययन अनुभव दिले जातील त्याप्रमाणे शिक्षकांनी मूल्यमापन साधनतंत्रांची निवड करणे आवश्यक आहे.

तोंडी काम या साधनतंत्रांसाठी पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी व रुब्रिक यापैकी कोणत्याही तंत्रांचा उपयोग करू शकतो. अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने प्रकटवाचन या साधनाद्वारे मूल्यमापन करण्यासाठी पदनिश्चयन श्रेणी वापरण्यासाठीचा एक नमुना दिला आहे.

Leave a Comment