केंद्रप्रमुख संवर्गाची अंतिम ज्येष्ठतायादी प्रसिध्द करणे बाबत kendrapramukh sevajeshthata list
संदर्भ :- 1) महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, 2021
2) केंद्रप्रमुख संवर्गाची तात्पुरती ज्येष्ठता यादी दिनांक 01/01/2024
3) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिपजा/शिक्षण/प्राथ-1/2024/135 दिनांक 11/01/2024
4) केंद्रप्रमुख संवर्गाची अंतिम ज्येष्ठतायादी दिनांक 01/01/2024
संदर्भ क्रमांक (01) मधील तरतूदीनुसार जि.प.जालना अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुख संवर्गातील कर्मचा-यांची तात्पुरती ज्येष्ठता यादी 01/01/2024 संदर्भ क्रमांक (03) अन्वये प्रसिध्द करून सूचना व हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार सदर यादीवर विहित कालावधीमध्ये प्राप्त सूचना/ हरकतीची पडताळणी करुन तात्पुरत्या ज्येष्ठता सूचीमध्ये योग्य ती दुरुस्ती करुन केंद्रप्रमुख संवर्गाची अंतिम ज्येष्ठता सूची दिनांक 01/01/2024 अंतिम करण्यात आलेली आहे.
केंद्रप्रमुख संवर्गाची अंतिम जेष्ठता सुची दिनांक 01/01/2024 या पत्रासोबत सलग्न करण्यात येत असून सदरील यादी आपल्या कार्यालयाच्या सुचना फलकावर व समाजमाध्यमावर प्रसिध्द करुन सर्वाना पाहणेसाठी उपलब्ध करुन द्यावी.
सोबत केंद्रप्रमुख संवर्गाची अंतिम ज्येष्ठता यादी दिनांक 01/01/2024.
जिल्हा परीषद चंद्रप्रमुख संवर्गाची अंतिम सेवा जेष्ठता यादी येथे पहा👉 pdf download