विद्यार्थ्यांना काहीच येईना; शिक्षक नेत्याला सीईओंनी केले निलंबित karvai on teacher
आदर्श शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे यांच्यावर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : जिल्हापरिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आडगाव सरक केंद्रांतर्गत पाबळ दिलीप ढाकणे तांडा येथील शाळेला दोन दिवसांपूर्वी अचानक भेट दिली होती.या शाळेतील २२ पैकी केवळ एकाच विद्यार्थ्यास संख्या वाचन व गणितीय क्रिया करता आली. दुसऱ्या दिवशी
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने शाळेला भेट दिली. त्यानंतर सुनावणी घेत शाळेतील दोनपैकी एक सहशिक्षक दिलीप ढाकणे यांच्या निलंबनाचे आदेश सीईओ मीना यांनी काढले आहे. ही कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. जि.प. सीईओ विकास मीना यांच्या सहीने निघालेल्या निलंबन आदेशात म्हटले की, १९ मार्च रोजी पाबळतांडा येथील शाळेला आकस्मिक भेट दिली. शाळेत पहिली ते पाचवीचे वर्ग असून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. तेव्हा २२ विद्यार्थ्यांपैकी एकालाच संख्या वाचन व गणितीय क्रिया करता आली. त्यामुळे शाळेच्या कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले. ही बाब गंभीर असून, जि. प. जिल्हा सेवा नियम १९६७ चे कलम ३ चा भंग करणारी आहे, यामुळे ढाकणेंचे निलंबन होत आहे.
• समितीतर्फे जि.प. सह विभागीय आयुक्तासमोर सतत आंदोलन करण्यात येत आहे. शिक्षकांच्या बदल्यानंतर केलेल्या विनंती बदल्यामध्ये गडबड झाल्याचा आरोपही संघटनेने केला होता.
• विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार, सततची आंदोलन करण्यात येत होती. सीईओंनी सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यास विरोध केला आहे.
• त्याच्या विरोधात दिलीप ढाकणे यांच्या नेतृत्वातच शिक्षक संघटनांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांकडे तक्रार नोंदवली होती. या सर्व घडमोडीमुळे सूडबुद्धीतून ही कारवाई झाल्याचा आरोपी शिक्षक संघटनांनी केला आहे.