आंतरजिल्हा बदली झालेले ३५० शिक्षक लवकरच स्वगृही:C लोकसभा निवडणुकीमुळे खो; नवीन नियुक्तीनंतर शिक्षकांना सोडणार inter district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतरजिल्हा बदली झालेले ३५० शिक्षक लवकरच स्वगृही:C लोकसभा निवडणुकीमुळे खो; नवीन नियुक्तीनंतर शिक्षकांना सोडणार inter district transfer 

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या

आचारसंहितेमुळे शिक्षण सेवक भरती रखडली आहे. शिवाय या शिक्षण सेवकांना येत्या शैक्षणिक वर्षातच नियुक्त्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतरच आंतरजिल्हा बदली झालेले ३५० शिक्षकही नवीन शैक्षणिक वर्षातच स्वगृही जाणार आहेत.

जिल्ह्यात शिक्षकांची १,९४१ पदे रिक्त असतानाही ३५० शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार आहे. त्यातच नवीन शिक्षण सेवक भरती प्रक्रियेमध्ये १ हजार १४ शिक्षक भरती आचारसंहितेमध्ये अडकली आहे. त्यांना प्रशासनाकडून नेमणुका देण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, शिक्षक संघटनांनी आधी शिक्षक बदल्या करा, नंतरच शिक्षण सेवकांना नेमणुका द्या, अशी भूमिका केली होती. त्यामुळे प्रशासनाने

शिक्षकांच्या बदल्या अगोदर केल्या. त्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निश्चित केले होते.

दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्याने नवीन शिक्षण सेवकांना नियुक्त्या देण्याबाबत प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी प्रशासनाने या नेमणुका देण्यापूर्वी शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने

शिक्षण सेवकांच्या नेमणुकांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने शिक्षक भरती तर रखडली. शिवाय त्याचा परिणाम आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीवर झाला आहे. नवीन शिक्षण सेवकांच्या नेमणुकीनंतरच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रशासनाची भूमिका असल्याने आता आचारसंहितेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या नवीन शैक्षणिक वर्षातच होणार आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षकही नवीन वर्षातच स्वगृही जाणार, हे निश्चित झाले आहे.

१,०१४

आचारसंहितेमुळे नवीन शिक्षण सेवक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक भरती अडकली

आंतरजिल्हा बदली ● झालेले शिक्षक स्वगृही जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, निवडणुकीमुळे त्यांची अजूनही सुटका करण्यात आलेली नाही.

१,९४१

जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे

शिक्षण सेवक भरतीतील शिक्षकांची नियुक्ती केल्याशिवाय बदली शिक्षकाना सोडू नये, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आलेली आहे.

inter district transfer 
inter district transfer

Leave a Comment