ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक : आंजिब-४८२०/प्र.क्र.२९१/आस्था-१४, दि. ०७ एप्रिल, २०२१ नुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया राज्यस्तरावर पूर्ण होऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या ३४६ शिक्षकांची यादी या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. सदर शिक्षकांना कार्यमुक्त करणेकरिता सर्व स्तरावरून विचारणा होत आहे. तसेच काही घटकांकडून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांकडून कार्यमुक्त करणेकरिता आर्थिक व्यवहार / गैरप्रकार होत असल्याची चर्चा सुरु आहे.
तरी याद्वारे जाहीर आवाहन करत आहोत की, रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे सद्यस्थितीत कोणत्याही परिस्थितीत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेत येणार नाही. याउपर काही घटकांकडून आर्थिक व्यवहार / गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांविरूध्द कठोर प्रशासकीय कारवाई करणेत येईल. तसेच संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करणेत येईल, याची नोंद घ्यावी.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे आदेशावरून.