आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत inter district transfer
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची दिनांक ०९/०३/२०२४ ला कार्यशाळा घेऊन समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे. तसेच बदली झालेल्या रिक्त जागेवर पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त शिक्षण सेवकांना रुजु आदेश दिनांक १२/०३/२०२४ ला देण्यात येणार आहे.
आंतर जिल्हा बदलीने कार्यमुक्त होणाऱ्या शिक्षकांनी दिनांक ११/०३/२०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यंत गोंदिया जिल्हयात रुजु व्हावे. तदनंतर सर्व जागा पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त शिक्षकांसाठी खुल्या केल्या जातील. आंतर जिल्हा बदलीने येणारे शिक्षक रुजु न झाल्यास जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सेवाजेष्ठता गमावल्या गेल्यास संबंधित कर्मचारी स्वतः जबाबदार राहतील.