दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोमवारी निकाल बोर्डात लगबग; ग्रेस पासिंगच्या गुणांची युद्धपातळीवर पडताळणी hsc results 2024

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोमवारी निकाल बोर्डात लगबग; ग्रेस पासिंगच्या गुणांची युद्धपातळीवर पडताळणी hsc results 2024

hsc results 2024
hsc results 2024

सकाळ वृत्तसेवा सोलापूर, ता. २३ : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता दहावीच्या निकाल जाहीर करण्याची बोर्डाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंगसाठी दिलेल्या चित्रकला, क्रीडा, लोककलेच्या गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू आहे. येत्या सोमवारी (ता. २७) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार असल्याचे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा २७ मे रोजी निकाल जाहीर होईल,

असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्र बसून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. इयत्ता दहावीच्या जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. १२ ते १५ जून दरम्यान राज्यातील बहुतेक अकृषिक विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत काही दिवस अगोदरच जाहीर केला आहे. आता दहावीच्या विद्यार्थ्यांचाही निकाल लवकर जाहीर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी लगेचच दीड महिन्यात मिळणार आहे.

दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्यांनाही अकरावी प्रवेश

■ इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या कला शाखेत प्रवेश घेता येतो. पण, जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण विषयात पास व्हावेच लागते. त्याशिवाय त्याला पुढे इयत्ता बारावीला प्रवेश घेता येत नाही.

Leave a Comment