द्वितीय सत्र मूल्यमापन 2024-25 मध्ये किती चाचण्या घ्याव्या लागणार? How many test take in year 2024-25
> नेमक्या किती चाचण्या होणार
> कोणत्या इयत्तेला किती व कोणत्या चाचण्या असणार
> कोणत्या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका मिळणार व कोणत्या शिक्षकांना तयार कराव्या लागणार
> कोणत्या चाचणीचे गुण संकलित मूल्यमापनासाठी ग्राहा धरता येणार
> कोणत्या चाचणीचे गुण स्विफ्ट चॅट अॅपवर भरावे लागणार
> कोणत्या वर्गांना पुनर्परीक्षा घ्यावी लागणार
> कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहे त्याच वर्गात राहणार व कोणत्या कारणाम
वरील सर्व मुद्द्यांचे समाधान आपण या PDF मधून पाहणार आहोत
१. नेमक्या किती चाचण्या होणार
द्वितीय सत्र मूल्यमापन – २०२४/२५
मित्रांनो या वर्षीच्या द्वितीय सत्र मूल्यमापन मध्ये एकूण ३ चाचण्या होणार
१. नेहमीची संकलित मूल्यमापन चाचणी क्र. २
२. नियतकालिक चाचणी क्र. २ PAT
३. वार्षिक परीक्षा
द्वितीय सत्र मूल्यमापन – २०२४/२५
२. कोणत्या इयत्तेला किती व कोणत्या चाचण्या असणार
१. नेहमीची संकलित मूल्यमापन चाचणी क्र. २
इयत्ता – १ ली, २ री, ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी
२. नियतकालिक चाचणी क्र. २ PAT
सर्व इयत्ता 3 ते ८ वी
३. वार्षिक परीक्षा
फक्त ५ वी आणि ८ वी साठी
कोणत्या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका मिळणार व कोणत्या शिक्षकांना तयार कराव्या लागणार
१. नेहमीची संकलित मूल्यमापन चाचणी क्र. २
इयत्ता – १ ली, २ री, ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी
या साठीच्या सर्व इयत्तांच्या प्रश्नपत्रिका शिक्षकांना स्वतः तयार कराव्या लागणार यामध्ये PAT चे मराठी गणित इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका प्राप्त होणार त्याच संकलितच्या समजाव्यात
१. नियतकालिक चाचणी क्र. २ PAT
सर्व इयत्ता 3 ते ८ वी
PAT चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्राप्त होणार
३. वार्षिक परीक्षा
फक्त ५ वी आणि ८ वी साठी या दोन इयत्तांच्या प्रश्नपत्रिका आपल्यालाचं बनवाव्या लागणार त्या प्रश्नपत्रिका आणि संविधान तक्ते यांचे नमुने mscert च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्या कशा शा डाउनलोड करायच्या त्याचे प्रात्यक्षिक व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला दाखवतो .
कोणत्या चाचणीचे गुण संकलित मूल्यमापनासाठी ग्राह्य धरता येणार
इयत्ता १ ली व २ री ची संकलित चाचणी
आणि
इ. ३ री, ४ थी, ६ वी आणि 7 वी या चार वर्गाच्या PAT चाचणीतील मराठी गणित इंग्रजी पेपेरचे गुण आणि उरलेल्या विषयांचे तुम्ही बनवलेल्या पेपरचे गुण
हे सर्व गुण संकलित चाचणीच्या मुल्यामापानासाठीचे गुण म्हणून निकाल्पत्राकात वापरता येतील.
कोणत्या चाचणीचे गुण स्विफ्ट चॅट अॅपवर भरावे लागणार
३ री, ४ थी, ५ वी, ६ वी, ७ वी आणि ८ वी या सहा वर्गाचे शासनाकडून प्राप्त झालेल्या मराठी गणित आणि इंग्रजी या तीन विषयांचेच गुण स्विफ्ट CHAT APP वर भरावे लागतील
कोणत्या वर्गांना वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षा घ्यावी लागणार
इयत्ता ५ वी व ८ वी साठी
PAT चाचणी घेतल्यानंतर स्वतंत्र पणे वार्षिक परीक्षा घ्यावी लागणार
आणि जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेत ज्या विषयात ३५% पेक्षा कमी गुण मिळवतील त्यांना पुढील दोन महिने
अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा तेव्हढ्याच विद्यार्थ्यांची संबंधित
विषयांची पुनर्परीक्षा घ्यावी लागेल
पुनर्परीक्षेला प्रविष्ठ असणारे विद्यार्थी जर पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झाले तर पुढील वर्गात जातील अन्यथा आहे त्याच म्हणजेच ५ वी चा ५ वी मध्येच आणि ८ वी चे ८ वी मध्येच राहतील EPAK KAMBL
• कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहे त्याच वर्गात राहणार व कोणत्या कारणामुळे
मित्रांनो इयत्ता ५ वी व ८ वी चे विद्यार्थी आहे त्याच वर्गात राहू शकतात पण खालील परिस्थितीत
वार्षिक परीक्षेत काही विषयात ३५% पेक्षा कमी गुण मिळवून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून नंतर घेतलेल्या पुनर्परीक्षेतही सदरचे विद्यार्थी पुन्हा ३५% पेक्षा कमी गुण मिळवून जर अनुत्तीर्ण झाले तर मात्र अशा परीस्थित सदरचे विद्यार्थी त्याच वर्गात म्हणजेच ते ५ वी चे असतील तर ५ वी तच आणि ८ वी चे असतील तर ८ वी तच पुढील शैक्षणिक वर्षात २०२४-२५ मध्ये शिक्षण घेतील
It is best source of knowledge