सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेमध्ये प्रविष्ट होणा-या खेळाडू विर्घार्थ्यांना क्रीडा सवलत प्रस्ताव सादर करणेबाबत higher secondary certificate exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी व १२ वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेमध्ये प्रविष्ट होणा-या खेळाडू विर्घार्थ्यांना क्रीडा सवलत प्रस्ताव सादर करणेबाबत higher secondary certificate exam 

संदर्भ

: १/शासन शुद्धीपत्रक क्रमांक निर्णय / उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/एस.डी.२ मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक- २० डिसेंबर २०१८ व २५ जानेवारी २०१९.

२. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य, शिक्षण मंडळाचे पत्र क्रंमाक/पुविमं/माध्य/क/क्रीडा /८०० पुणे दि.०७/०२/२०२४.

उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतलेला आहे. पुणे विभागीय मंडळाने संदर्भिय २ च्या पत्रान्वये शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण प्रस्ताव सादर करणेबाबत मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे

१. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता. १० वी) परिक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ.६ वी पासून १० वी पर्यंत केव्हांही क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य मिळविले असल्यास क्रीडा सवलत गुण देण्यात येतील तथापी त्या विद्यार्थ्याने इ.१० वी मध्ये क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक राहील व सहभागाचा पुरावा (ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रत मुख्याध्यापक स्वाक्षरीनिशी जोडणे आवश्यक राहील)

२. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इ.१२ वी) मध्ये प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता ६ वी पासून १२ वी पर्यंत केव्हांही क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. परंतु सदर खेळाडूंस इ.१० वी मध्ये सदर प्रमाणपत्रावर क्रीडा सवलत गुण घेतले असल्यास यावर्षी तो क्रीडा सवलत गुण घेण्यास पात्र असणार नाही. तथापी या खेळाडूंने इ.११ वी १२ वी मध्ये प्राविण्य / सहभाग घेतला असेल तर तो क्रीडा सवलत गुण देण्यास पात्र राहील.

३. भारतीय शालेय खेळ महासंघ व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा. पुणे आयोजित जिल्हा विभाग राज्य व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.

४. खेळाडू कोणत्याही जिल्ह्यातून खेळला तरी, खेळाडू विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असेल त्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे शिफारशीसह प्रस्ताव सादर करावा.

५. क्रीडा संचालनालयाने मान्यता दिलेल्या खेळप्रकारातील एकविध खेळ संघटनानी आयोजित केलेल्या राज्यस्तर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरिल सहभाग व प्राविण्य खेळाडूच क्रीडा सवलत गुणास पात्र राहतील.

तथापी एकविध खेळ संघटनानी संदर्भ क्रं.१ च्या शासन निर्णयानुसार सन २०२३-२४ या वर्षातील आवश्यक सर्व कागदपत्रे व स्पर्धा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावीत जेणेकरुन खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर करता येतील. कागदपत्रे प्राप्त न झाल्यास सदर खेळाडूंचे प्रस्ताव शिफारस करता येणार नाहीत त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांच्या होणा- या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहाणार नाही.

६. इयत्ता १० वी १२ वी मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल तर सदर खेळाडूचे सर्वोच्च कामगीरी असलेल्या एकाच पात्र खेळाचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे.

७. प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी ही संबधीत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची राहील. शाळा कर्मचारी / शिक्षक यांचेमार्फत प्रस्ताव सादर करावेत पालकांसोबत प्रस्ताव पाठवू नये. संबधीत प्रस्तावात त्रुटीमुळे विद्यार्थ्यास क्रीडा सवलत गुण न मिळाल्यास संबधीत शाळा/क. महाविद्यालय

जबाबदार राहील.

याबाबत अधिक माहितीसाठी श्री. प्रकाश मोहारे, ९८९०५५३४००, तालुका क्रीडा अधिकारी, श्री. शिवाजी कोळी, राज्य क्रीडा मार्गदर्शक -७०२०३३०४८८, श्री. राजेंद्र मागाडे, क्रीडाशिक्षक (से. नि.) यांचेशी संपर्क साधावा .

सोबत : क्रीडा सवलत गुण अर्ज नमुना

विद्यार्थ्यांची स्वाक्षरी

शारिरीक शिक्षण शिक्षकाचे नांव:–

– मोबाईल क्रमांक

मोबा.क्रंमाक

उपरोक्त विद्यार्थ्याने भरलेली माहिती तपासली असून ती बरोबर आहे. सदर खेळाडू हा २०२१-२३ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी असुन जिल्हा /विभाग/राज्यस्तर/राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेला प्राविण्य प्राप्त खेळाडू आहे. सोबत या स्पर्धेचे प्रमाणपत्र सांक्षांकीत करुन सवलतीच्या गुणाकरीता शिफारस करण्यात येत आहे. खोटी /अथवा चुकिची माहिर्ती आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाहीस खेळाडू व संस्था पात्र राहिल याची मला जाणीव आहे. दिनांक – / /२०२४

शासन निर्णय pdf येथे पहा

👉👉pdf download 

Leave a Comment