सामान्यज्ञान प्रश्नावली gk मराठी या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न gk
*(1) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर — पोळे*
———————————–
*(2) घोड्याच्या घरास काय म्हणतात ?*
*उत्तर — तबेला*
———————————–
*(3) कोंबडीच्या घरास काय म्हणतात ?*
*उत्तर — खुराडे*
———————————–
*(4) उंदराच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर — बीळ*
———————————–
*(5) चिमणीच्या घराला काय म्हणतात ?*
*उत्तर — घरटे*
———————————–
*(6) सिंहाच्या निवा-यास काय म्हणतात ?*
*उत्तर — गुहा*
———————————–
*(7) माणसाच्या निवा-यास काय म्हणतात ?*
*उत्तर — घर*
———————————–
*(8) वाघाच्या निवा-याला काय म्हणतात ?*
*उत्तर — गुहा*
———————————–
*(9) गाई – गुरांना बांधण्याच्या जागेस काय म्हणतात ?*
*उत्तर — गोठा*
———————————–
*(10) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?*
*उत्तर — थवा*
———————————–
*(11) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?*
*उत्तर — गुच्छ*
———————————–
*(12) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?*
*उत्तर — ताटवा*
———————————–
*(13) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?*
*उत्तर — बेट*
———————————–
*(14) बैलांच्या ओरडण्याला काय म्हणतात ?*
*उत्तर — हंबरणे*
———————————–
*(15) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?*
*उत्तर — रेकणे*
———————————–
*(16) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — रेडकू*
———————————–
*(17) घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — शिंगरु*
———————————–
*(18) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — बच्चा ,. बछडा*
———————————–
*(19) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — वासरू*
———————————–
*(20) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — पाडस, शावक*
———————————–
*(21) शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — करडू*
———————————–
*(22) कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — पिल्लू*
———————————–
*(23) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — छावा*
———————————–
*(24) मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — कोकरू*
———————————–
*(25) गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात ?*
*उत्तर — शिंगरु*
*(26) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*
*उत्तर — सिंह*
*(27) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?*
*उत्तर — गुलाब*
*(28) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*
*उत्तर — गरूड*
*(29) भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ?*
*उत्तर — तिरंगा*
*(30) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?*
*उत्तर — जनगणमन*
*(31) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?*
*उत्तर — आंबा*
*(32) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?*
*उत्तर — कमळ*
*(33) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?*
*उत्तर — मोर*
*(34) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?*
*उत्तर — वाघ*
*(35) तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ?*
*उत्तर — शेंगदाणा*
======================
Khup chan