वर्षा वर आधारित प्रश्न सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
✓ सामान्य वर्ष = 365 दिवस
✓ लीप वर्ष = 366 दिवस
(१) ज्या वर्षाला (सनाला) 4 ने भाग जातो व शतकी वर्षाला 400 ने भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात.
(२) सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते, त्याचा शेवट सुद्धा त्याच वाराने होतो.
(३) लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते, त्याचा शेवट मात्र पुढील वाराने होतो.
(४) प्रत्येक महिन्याच्या 1, 2, 3 तारखांना जे वार असतात तेच वार त्या महिन्याच्या अनुक्रमे 29, 30, 31 या तारखांना असतात.
(५) 31 तारखेच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात व इतर वार 4 वेळा येतात.
(६) 30 तारखेच्या महिन्यामध्ये 1 व 2 तारखेचे वार 5 वेळा येतात व इतर बार 4 वेळा येतात.
(७) सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते, त्याच्या पुढील वाराने पुढील वर्षाची सुरुवात होते.
(८) लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते. त्याच्या पुढील दुसऱ्या वाराने त्यापुढील वर्षाची सुरुवात होते.
(९) प्रत्येक वर्षामध्ये स्वातंत्र्य दिन, बालदिन, शिक्षक दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे वार एकाच दिवशी येतात.
(१०) प्रत्येक वर्षामध्ये महाराष्ट्र दिन, म. गांधी जयंती, नाताळ हे तिन्ही दिवस एकाच वारी येतात.
(११) सामान्य वर्षात खालील महिन्याच्या प्रत्येक तारखेस सारखेच वार येतात.
उदा.: सामान्य वर्षात 1 जानेवारी ते 31 जानेवारी या तारखांना जे वार येतील तेच वार त्याच वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या 1 ते 31 (ऑक्टोबर) दरम्यान येतात.) याचप्रमाणे सामान्य वर्षात खालील तीन विविध गटांतील महिन्यांच्या तारखांचे वार समान येतात.
गट (1) सप्टेंबर, डिसेंबर, / गट 2) फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर, /
गट 3) एप्रिल, जुलै
(१२) या लीप वर्षात 1 जानेवारी ते 31 जानेवारी या तारखांना जे वार येतील तेच वार त्याच वर्षाच्या 1 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान येतात.) याचप्रमाणे लीप वर्षात खालील दोन गटांतील महिन्यांच्या तारखांचे वार समान येतात.
गट 1) फेब्रुवारी, ऑगस्ट, / गट 2) मार्च, नोव्हेंबर
===========================