कार्ल मार्क्स एकदा म्हणाला होता की, प्रत्येक पिढीगणिक तुम्ही लोकांचे एक-एक स्वातंत्र्य काढून घ्या आणि शेवटी त्यांना कशाचेच स्वातंत्र्य उरणार नाही. तरीदेखील त्यांना त्याचे काहीही वाटणार नाही.
वर्गातील एक गोष्ट ऐका.
एके दिवशी सगळा वर्ग प्रयोगशाळेत जमला होता. त्या वेळी प्राध्यापकांच्या लक्षात आले की, एक विद्यार्थी हात मागे घेऊन त्याची पाठ दाबत आहे. जणू काही त्याची पाठ दुखत असावी.
प्राध्यापकांनी त्याच्याकडे पाहन विचारले, काय झाले आहे?
तो विद्यार्थी म्हणाला, काल रात्री त्याच्या पाठीत बंदकीची गोळी घुसली. देशातील कम्युनिस्टांशी लढताना त्याला गोळी लागली. हे कम्युनिस्ट देशातील सरकार उलथवून टाकून त्या ठिकाणी कम्युनिस्ट राजवट आणू इच्छित होते.
एवढे सांगून त्या विद्यार्थ्याने प्राध्यापकांकडे पाहिले आणि एक विवित्र प्रश्न विचारला. तुम्हाला माहीत आहे का, रानडुकरांना कसे पकडले जाते?
प्राध्यापकांना वाटले, हा विनोद आहे आणि यातील पंचलाइन काय, असे त्यांनी विद्यार्थ्याला विचारले.
तो तरुण नम्रपणे म्हणाला, हा विनोद अजिबात नाही. मी सांगतो रानडुकरांना कसे पकडले जाते.
जंगलातील योग्य जागा निवडली जाते. त्या ठिकाणी मक्याची कणसे ठेवली जातात, रानडुकरे त्या ठिकाणी रोज येतात आणि मिळालेली आयती कणसे खाऊन जातात. मग त्यांना रोज त्या ठिकाणी येण्याची सवय लागते.
अशी सवय लागल्यावर एका बाजूला कुंपण केले जाते आणि दुसन्या बाजूला कणसे ठेवली जातात. रानडुकरे कुंपणाच्या एका बाजूने येऊन ती कणसे खाऊ लागतात. मग हळूहळू दुसऱ्या बाजूला कुंपण केले जाते. रानडुकरे उरलेल्या बाजूने येऊन कणसांवर ताव मारतात. काही दिवसांनी तिसन्या आणि चौथ्या बाजूलाही कुंपण करून एक गेट तयार केले जाते.
मग सवयीप्रमाणे रानडुकरांचा
कळप येतो आणि गेटमधून आत जाऊन कणसांचा फडशा पाडतो. त्याचवेळी ते गेट बंद होते. आता त्यांना जंगलाकडे परत जाण्याचा मार्ग उरलेला नसतो. मग ते पारतंत्र्य मान्य करतात आणि एक दिवस त्यांची कत्तलखान्याकडे रवानगी केली जाते.
एवढे सांगून तो तरुण विद्यार्थी प्राध्यापकांना म्हणाला, आजही अनेक देशांमध्ये हेच घडत आहे. अनेक देशांमधील सरकारे लोकांना समाजवादाकडे ढकलत आहेत. मोफत धान्य, मोफत वीज, करसवलत, शेतीवर अनुदान, कल्याणकारी योजना, मोफत औषधे अशा अनेक गोष्टी लोकांना मोफत वाटल्या जातात आणि त्या बदल्यात हळूहळू त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते.
प्रत्येकाने एक साधे सत्य लक्षात ठेवले पाहिजे की, या जगात कोणीही कुणालाही काहीही मोफत द्यायला बसलेला नाही. तुम्हाला असे वाटत असेल मोफत मिळाले की, आपले आयुष्य चांगले होईल, तर जेव्हा स्वातंत्र्याचे दरवाजे बंद होतील, तेव्हा देवव तुम्हाला वाचवू शकतो.
आजच्या घडीला आपण ज्या अनेक समस्यांना तोंड देत आहोत ते केवळ जगण्यासाठी काम करणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत मत देण्यासाठी जगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे म्हणून.