लोकमत न्यूज नेटवर्क तोहोगाव : कुणीही निरक्षर राहू नये
म्हणून महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाला काही गाइडलाइन दिल्या. त्यात गावातील निरक्षरांना वयोगटानुसार शिक्षित करण्यासाठी एक स्वयंसेवक नेमावयाचा आहे. मात्र त्याला या कामाचा कसलाही मोबदला मिळणार नाही, असे शासनाचे आदेश आहेत. विना मोबदल्यात शिकवायला कुणीही तयार नाही म्हणून निरक्षर निरक्षरच राहिले.
दिनांक 17मार्च 2024 ला परीक्षा fln programme
असे असतानाही शासनाने त्यांची १७ मार्चला संबंधित शाळेत परीक्षा ठेवली आहे. त्यामुळे हे निरक्षर भांबावलेले दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे, नियमानुसार या निरक्षरांना आधी शिक्षित करणे गरजेचे होते.
आधीच निरक्षर असताना ते काय परीक्षा देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निरक्षरांना शिक्षित न करता परीक्षा घेणे म्हणजे केवळ कागदोपत्री साक्षर झाल्याचे आकडे दाखविणे होय, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
निरक्षरांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया fln programme
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक गावातील निरक्षर शोधले. त्यांना शिकविण्यासाठी स्वयंसेवक शोधले. पण, विनामोबदला शिकवायचे असल्याने कुणीही शिकवायला तयार नाही.
– पंढरीनाथ कन्नके – प्रभारी केंद्रप्रमुख तोहोगाव केंद्र
आम्हाला कोणी लिहाचं, वाचाचं शिकविले नाही व गुरुजीनी उद्या पेपर आहे म्हणून सांगितले, मले पेनच बरोबर धरता येत नाही. मी काय दगळाचा पेपर सोडवणार?
– जिजाबाई नीलकंठ बावणे निरक्षर सराडी