प्रदर्शनापूर्वीच 53 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा “फिरस्त्या” चित्रपट: 11 देशात कौतुक firastya marathi movie 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रदर्शनापूर्वीच 53 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा “फिरस्त्या” चित्रपट: 11 देशात कौतुक firastya marathi movie

प्रदर्शनापूर्वीच फिरस्त्या चित्रपटाचे अकरा देशात कौतुक मोठ्या परदेशात 53 पुरस्कार मिळवणारा चित्रपट

पुणे आयकर विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल भोसले यांनी कथा व दिग्दर्शन केलेल्या फिरस्त्या या मराठी चित्रपटाचे 11 देशात कौतुक झाले आहे.

जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने 53 पुरस्कार मिळवले आहेत.

निराशेच्या गर्दीत अडकलेल्यांना आत्मविश्वास देणाऱ्या या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

चित्रपटाची कथा

सकारात्मकतेचे बीज पेरणारा फिरस्त्या हा चित्रपट प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देण्याची संघर्ष करत यशापर्यंत पोहोचवण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादायी गोष्ट आहे.

प्रदर्शनापूर्वीच फिरस्त्याने भारताबाहेर अमेरिका रशिया इंग्लंड जपान फ्रान्स स्पेन सिंगापूर स्वीडन चेक रिपब्लिक रोमानिया या 11 देशातील 24 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण 53 पुरस्कार जिंकलेले आहेत.

चित्रपटाला मिळालेले पुरस्कार

यामध्ये सर्वात उत्कृष्ट चित्रपट 11 परस्कार , सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक 17 पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता सात पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पटकथा पाच पुरस्कार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण तीन पुरस्कार, सर्वात्कृष्ट पदार्पण दोन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संकलन एक पुरस्कार असे एकूण 53 पुरस्कार मिळालेले आहेत तसेच फिरस्त्याची फायनल लिस्ट म्हणून

तसेच फिरस्त्याची फायनल लिस्ट म्हणून अमेरिका रशिया स्वीडन आणि तुर्की या चार देशांमधील चार चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.

चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन

चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांनी लेखन आणि दिग्दर्शनाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि युट्युब वरील व्हिडिओ पाहून हा चित्रपट बनवला आहे.

विठ्ठल भोसले यांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी हे गाव आहे.

चित्रपट निर्माती

निर्माती डॉक्टर स्वप्ना भोसले यांनी झुंजार मोशन पिक्चर द्वारे या चित्रपटाची निर्मिती केली आहे

चित्रपटाचे प्रमुख कलाकार

चित्रपटाचे प्रमुख कलाकार हे बार्शीचे सुपुत्र समीर परांजपे हरीश बारस्कर मयुरी कापडणे आणि अंजली जोगळेकर आहेत.

प्रमुख बालकलाकार -आज्ञेश मोरसिंगकर श्रावणी समर्थ जाधव आहेत

फिरस्त्यासाठी पार्श्वगायन -आदर्श शिंदे वैशाली सामंत स्वप्निल बांदोडकर रोहित नाग भिडे देवदत्त मनीषा

पार्श्वसंगीत -रोहित ठाकर वैभव देशमुख

छायाचित्रण -गिरीश जांभळीकर

ध्वनी संयोजन -राजेंद्र त्यागी यांनी केले आहे

1 thought on “प्रदर्शनापूर्वीच 53 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा “फिरस्त्या” चित्रपट: 11 देशात कौतुक firastya marathi movie ”

Leave a Comment