शिक्षकांना रोज द्यावे लागतील अडीच तास जादा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सीईओंचे आदेश, १ मार्चपासून अंमलबजावणी extra teaching hours 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Extra teaching hours
Extra teaching hours

शिक्षकांना रोज द्यावे लागतील अडीच तास जादा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सीईओंचे आदेश, १ मार्चपासून अंमलबजावणी extra teaching hours 

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शिक्षकांचे किमान तास निश्चित करण्यात आलेले आहेत. या नवीन पत्रानुसार शाळेव्यतिरिक्त शिक्षकांना दररोज अडीच तास जादा द्यावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या १ मार्चपासून करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारी अधिनियम २००९ अन्वये शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला शाळेतील कामाचे तास व शाळाबाहेरील चिंतन व अभ्यासाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. यात प्रत्येक शिक्षकासाठी दर आठवड्याला पाठाची तयारी करण्यासह अध्यापनाचे ४५ तास निश्चित केले आहेत. यात शाळाबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी १५ तास व प्रत्यक्ष शाळेतील शिकविण्याचे किमान ३० तासांचा समावेश असेल, पाठाची तयारी करण्यासाठी दररोज १५० मिनिटे म्हणजे २ तास ३० मिनिटे देणे आवश्यक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, १ मार्च ते ३० एप्रिल २४ अखेरपर्यंत शालेय वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी १२.४५, तर शनिवारी सकाळी ७.२५ ते सकाळी ११.३० अशी राहणार आहे. मात्र शिक्षकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ३.१५ तसेच शनिवारी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम करावे लागणार आहे.

Extra teaching hours
Extra teaching hours

दररोजच्या अडीच तासात शिक्षकांनी पाठासाठी मुद्देनिहाय माहिती संकलित करावी लागेल. त्याचबरोबर अध्ययन व अध्यापनविषयक साहित्य तयार करणे, पाठाचे टाचण तयार करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनविषयक नोंदी, तंत्रे विकसित करणे, प्रत्यक्ष मूल्यांकन करणे, मुलांना शिकविण्याच्या दृष्टीने चांगले ज्ञानयुक्त पुस्तके वाचणे, अभ्यासात मागे असलेल्या मुलांना प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणे आदींचा समावेश आहे. अध्यापनाचे तास व पाठाच्या तयारीसाठी असलेले तास कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही. प्रभावी अंमलबजावणी करावी, असे चारही तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात शिक्षक संघटनांनी विरोधाचे अस्त्र उपसले त्याचा उपयोग झालेला नाही.

नवीन शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबवा

जिल्हा परिषद

शिक्षकांचे म्हणणे आहे.

शैक्षणिक वर्ष अवघे दोन महिने शिल्लक आहे. त्यातच आगामी काळ हा उन्हाळ्याचा आहे. त्यामुळे अशा कडक उन्हात शिक्षकांना जादा तास काम करायला लावणे योग्य नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून याची अमलबजावणी झाली असती तर त्याचा जास्त लाभ झाला असता, शिक्षकांनाही तयारी करायला वेळ मिळाला असता, असेही काही

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आरटीई कायद्यांतर्गत शिक्षकांना आता रोज अडीच तास जादा काम करावे लागणार आहे. यापूर्वी शिक्षक आठवड्यातून ३० तास काम करीत होते, ते आता ४५ तास करावे लागणार आहे. याची अंमलबजावणी येत्या १ मार्चपासून करण्यात येणार आहे. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे

शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मानसिक स्थितीचा विचार न करता अतिशय घाईघाईने हा निर्णय घेतला आहे. विचार करून निर्णय घेतला असता तर त्याचे निश्चित स्वागत केले असते. अजुनही या निर्णयाचा फेर विचार व्हावा, या निर्णयाची नंतर अंमलबजावणी करावी.

– राजेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, जिल्हा

प्राथमिक शिक्षक संघटना, धळे

13 thoughts on “शिक्षकांना रोज द्यावे लागतील अडीच तास जादा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सीईओंचे आदेश, १ मार्चपासून अंमलबजावणी extra teaching hours ”

  1. मग शिक्षकांना एकतर जास्त पगार कमी करा, आणि दुसरे असे की शिक्षकांना शिक्षणा वितिरिक्त शाळा बाह्य कामे सरकारने बंद करावे आणि जसे कंपनीचा एक रुल असतो तसे शाळेत थम मशीन लावावी की जो कोणी शिक्षक स्टाफ टायमिंग ला शाळेत हजार होणार नाही किंवा लवकर जाणार तर त्या शिक्षकाला ऑटोमॅटिक वेतन कमी होईल

  2. खूपच छान…

    पण मला असं वाटत, आहे त्या वेळेतच त्यांनी व्यवस्थित काम केलं तर सगळं व्यवस्थित होईल… शिस्तीत..

  3. एकीकडे शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण,करायचे,गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे.दोन-दोन महीने बुथ लेव्हल अधिका-यांचे काम,इतर अनेक अशैक्षणिक काम,मराठा आरक्षण सर्व्हे, तात्काळ शाळेची विद्यार्थी माहीती, मध्यान्ह भोजन, शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे, अशिक्षित लोकांचा सर्व्हे असे 150 काम शाळे व्यतिरिक्त काम द्यायचे शिक्षकांना शिकवण्यासाठी वर्षभर वेळच देत नाही.एकीकडे सरकारी शिक्षकांना अनेक कामे, खाजगी शाळेतील शिक्षकांना शिकविण्याशिवाय दुसरे काम नाही. गुणवत्ता वाढीचे ढोंग करायचे .हा दुजा भाव आहे.

  4. फेब्रुवारी महिन्यात जवळपास नियमित अभ्यासक्रम जवळपास पूर्ण होत आलेला असतो. त्यामुळे शाळेच्या नियमित वेळेतही शिक्षक विद्यार्थ्यांची अधिक तयारी व सराव करून घेऊ शकतात

  5. एक चांगला निर्णय, माहे मार्च एप्रिल मध्ये अभ्यासक्रम पण ब-याच प्रमाणात संपलेला असतो. माननिय CEO नी कुठलाहे अतिरीक्त तास वाढवलेले नाहीत. केवळ अंमलबजावणी केली आहे व ही काळाची गरज आहे व सुरूवात धुळेतुन होतेय हे अजुन चांगले आहे.

  6. हे सर्व शिक्षकांना मनस्ताप देण्याचे प्रकार चालले आहेत.

  7. Highschool मधील शिक्षकांनाही बराच कामाचा लोड आहे सतत शाळाबाह्य कामे लावून मुख्य टिचिंग चे काम राहून जात आहे आहे तो वेळ पुरेसा असताना नको तो वेळ वाढवणे योग्य वाटत नाही सतत चे त्रैनिंग शाबाह्य कामामुळे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही प्रथम ते थांबवा

  8. Baheril kame बंद करा. वर्गात अध्यापन करू द्यावे. फक्त आणि फक्त…….
    Jada तास देऊन काय होईल. ते अजून vitagtil …पुढील वर्षाच्या आधी नियोजन करावे लागेल. आत्ता nivdnuka येतील. मग काय????

  9. गव्हर्नमेंट आहेत, त्यांना टेंशन नाही, कारण 7. ते 12.45 काय किंवा 2 वाचले तरी काय? कारण तितका सरकारचा पगार त्यांना 60000/70000 घेतात,पण आमच्या सारख्या फक्त 7000 पगार असलेल्या शिक्षकांना जास्त वेळेचा मोबदला दिला जात नाही. विना अनुदानित शिक्षकाचे काय? त्यांना पगार वाढ करीत नाहीत. अनुदानित त्याच वेळेला येतात, आणि विना अनुदानित त्यांच वेळेला, मग इतकी तफावत का,?

  10. शिक्षकांना शाळाबाह्य कामे बंद करावी
    शाळेत आल्यानंतर व शाळा सुटल्यानंतर बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी
    विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासावी
    वेळेवर पगार देण्यात यावा
    सर्व शिक्षकांना समान वेतन देण्यात यावा
    शिक्षकांची खाजगी व्यवसाय किंवा शिकवणी बंद करण्यात यावी
    ज्या शाळेत नोकरीला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीच पूर्णवेळ शिक्षकांनी द्यावा
    स्थानिक स्कूल कमिटी उच्चशिक्षित असावी आणि सर्व स्टाफ वर त्यांना नियंत्रण ठेवण्याचे अधिकार असावे
    शिक्षकांच्या सततच्या ट्रेनिंग बंद करण्यात याव्यात
    विषय शिक्षक त्याच विषयाचा शिक्षक असणे अत्यंत महत्वाचे आहे

  11. खुप उपयुक्त निर्णय. ज्यासाठी शिक्षक आहे ती कामे करायला आनंदच आहे. त्यासाठी ज्यादा वेळ द्यायला काहीच हरकत नाही. पण मग याव्यतिरिक्त जी अशैक्षणिक कामे करायला शिक्षकांना भाग पाडले जाते ती बंद झाली पाहिजेत.

  12. आम्ही शिक्षक वेळ देतो. परंतु तुमचे एवढे उपक्रम राबविले जातात आणि ट्रेनिंग की आम्ही विषयाला वेळ देऊ की टिचींगला
    त्यानंतर ५ वर्ग टारगेट असतो जेव्हा की गावात सर्वांचा घरी २ मुले जन्माला आली आहे. त्यामुळें ऍडमिशन मिळणं कठीण असते.
    सतत तुमचे उपक्रम राबविले जातात त्यामुळे विद्यार्थीकडे लक्ष कसं द्यायचं

  13. सबसे पहले सभी शिक्षकों के शिक्षा देने के व्यतिरेक्त जो काम है जैसे BLO काम, अलग-अलग प्रशिक्षण देने का काम, या फिर मतदार यादी जमा करने का का, मराठा आरक्षण, ऐसे कई सारे जो काम शिक्षकों को दिए गए हैं। वह काम पहले कम करें। इससे विद्यार्थियों को सीखने के लिए ज्यादा समय मिल सकेगा।
    मार्च और अप्रैल महीने में शिक्षकों का सीखाने का सिलेबस करीब करीब पूरा हो चुका होता है। इसलिए उन्हें अलग समय देकर सीखने की जरूरत नहीं लगती। जो समय है, उसी समय में वह पूरा हो सकता है। महाराष्ट्र के अलग-अलग जिला में धूप बढ़ रही है और ज्यादा समय इस धूप में बच्चों को स्कूल में नहीं रखा जा सकता, उससे उनकी तबीयत पर असर होगा और कुछ गांव पर तो पानी की किल्लत भी आई हुई है।
    कोई कंपनी भी किसी कामगार से इतना काम नहीं करवाती है। जितना शिक्षकों से काम करवा लिया जाता है।
    शिक्षक भी एक इंसान है और उसका भी एक परिवार है, एक घर है, यह भी अधिकारी वर्गों को समझ में आ जाए तो अच्छा।

Leave a Comment