आंतरजिल्हा बदलीने आलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत विभागीय आयुक्तांचे सीईओ ना आदेश extra increment
संदर्भ :- श्री.योगेश धात्रक (जिल्हाध्यक्ष) प्रहार शिक्षक संघटना धुळे यांचे जा.क्र.१७/२०२३ दि.२६/१२/२०२३ रोजीचे पत्र
आयुक्तांचे पत्र येथे पहा
👉👉pdf download
वरील विषयी श्री. योगेश धात्रक (जिल्हाध्यक्ष) प्रहार शिक्षक संघटना धुळे यांनी आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना शासन निर्देशानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत सादर केलेला अर्ज पुढील कार्यवाहीस्तव आपणाकडे पाठविण्यात येत आहे.
प्रकरणी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व परिपत्रकांचे अनुषंगाने आपले स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा तसेच, प्रहार दिव्यांग शासकिय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना मुंबई यांना आपले स्तरावरुन परस्पर कळविण्यात यावे.