वर्ग 5 वा परीसर अभ्यास बहुपर्यायी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे evs general knowledge question answer
१) आपली पृथ्वी आपली सूर्यमाला
१) आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात ?
खगोलीय वस्तू
२) ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात ?
तारे
३) सूर्य काय आहे ?
तारा
४) तारे कसे आहेत ?
स्वयंप्रकाशित
५) ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय म्हणतात ? ग्रह
६) ग्रह स्वताः भोवती फिरता फिरता कोणा भोवती फिरतात ?
ताऱ्याभोवती
७) आपल्या पृथ्वीला कोणापासून प्रकाश मिळतो ?
सूर्यापासून
८) आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात ?
पृथ्वीचे परिभ्रमण
९) सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या सात ग्रहांची नावे सांगा.
बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून डी.
१०) प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो, त्या मार्गाला काय म्हणतात ?
ग्रहाची कक्षा
११ ) सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे काय म्हणतात ?
सूर्यमाला
१२) काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना काय म्हणतात ?
उपग्रह
१३) चंद्र स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा काय म्हणतात ?
उपग्रह
१४) नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना काय म्हणतात ?
बटुग्रह
१५) मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे, त्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना काय म्हणतात ?
लघुग्रह
१६) सूर्यमालेत कशा कशाचा समावेश होतो ?
ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह
१७) खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतः कडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते, या शक्तीला काय म्हणतात ?
गुरुत्वाकर्षण शक्ती
१८) ग्रह, तारे यांमधील असणारी रिकामी जागा म्हणजे काय ?
अवकाश
१९) पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरूदध शक्ती दयावी लागते, त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास काय म्हणतात ?
अवकाश प्रक्षेपण तंत्र
२०) भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा लॉगफॉर्म काय ?
२१) इस्त्रो मार्फत चंद्रावर कधी यान सोडले होते ?
२२ ऑक्टोबर २००८ डी.
२२) मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?
मॉम
२३) पहिले मंगलयान मंगळ ग्रहाभोवती कधी प्रस्थापित झाले ?
२४ सप्टेंबर २०१४
२४) अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
शक्तिशाली अग्निबाणांचा
२५) अवकाशयानातून वैज्ञानिक काही मोहिमांमध्ये जातात त्यांना काय म्हणतात ?
अंतराळवीर
२६) १९८४ साली कोणते भारतीय अंतराळवीर अवकाशात गेले ?
राकेश शर्मा
२७) भारतीय वंशाच्या कोणकोणत्या अंतराळवीर होत्या ?
कल्पना चावला, सुनीता विल्यम्स
२८) कृत्रिम उपग्रहांचा उपयोग कशासाठी केला जातो ? पर्यावरणाचे निरिक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे, संदेशवहन करण्यासाठी
(३) उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात, या काल्पनिक वर्तुळाला काय म्हणतात ? विषुववृत्त
४) विषुववृत्तामुळे पृथ्वीचे कोणते दोन समान भाग होतात ?
उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध
५) पृथ्वी स्वतः भोवती कोणत्या दिशेने फिरते ? पश्चिमेकडून पूर्वेकडे ६) पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीला काय म्हणतात ? दिवस
७) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतात ? वर्ष
८) एका वर्षात किती दिवस व तास असतात ? एका दिवस व ६ तास वर्षात ३६५ S ९) लीप वर्षात किती दिवस असतात ? ३६६ दिवस
१०) लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो ? २९ दिवसांचा ११) कोणत्या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते ? २२
मार्च ते २३ सप्टेंबर
१२) दक्षिण गोलार्धात दिनमान कधी जास्त असते ? २३ सप्टेंबर ते २२ मार्च १३) चंद्र कोणाभोवती परिभ्रमण करतो ? पृथ्वीभोवती
१४) आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग केव्हा दिसतो ? पौर्णिमेला १५) कोणत्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही ? अमावास्येच्या
१६) अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र पुन्हा वाढत वाढत जातो याला काय म्हणतात ? चंद्राच्या कला
१७) अमावास्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला १४ किंवा १५ दिवस लागतात या पंधरवाड्याला काय म्हणतात ? शुक्लपक्ष
१८) पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी होऊ लागतो, १४-१५ दिवसांनी पुन्हा अमावास्या येते, या पंधरवाड्याला काय म्हणतात ? कृष्णपक्ष १९) चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात ? तिथी
२०) पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते ? दिन व रात
२१) एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतच्या काळाला काय म्हणतात ?
चांद्रमास
१) पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग जमिनीचा आहे ?
१/३
२) जमिनीच्या सलग व मोठ्या भागास काय म्हणतात ?
खंड
३) पृथ्वीवरील किती खंड आहेत ?
सात
४) सात खंड कोणते ?
आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप
५) सर्वांत मोठा खंड कोणता ?
आशिया
६) सर्वात लहान खंड कोणता ?
ऑस्ट्रेलिया
७) जमिनीच्या उंचसखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात त्यांना काय म्हणतात ?
भूरुपे
८ ) पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती भाग पाण्याने व्यापलेला आहे ?
२/३
९) महासागरामधील पाणी कसे से असते ?
खारे
१०) पाच महासागरांची नावे सांगा.
अटलांटिक, पॅसिफिक, आर्किटक, हिंदी महासागर, दक्षिण महासागर
११) महासागरांची जलरूपे भाग कोणते ?
समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी
१२) जमिनीच्या एखादया सखल भागात नैसर्गिकरीत्या पाणी साठून तयार
झालेल्या मोठ्या जलाशयाला काय म्हणतात ? सरोवर
१३) समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना काय म्हणतात ?
हिमनग
१४) जमिनीवरील जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरांत खूप
साठलेले पाणी असते, त्याला काय म्हणतात ? भूजल
१५) पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील
बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे काय म्हणतात ? जलावरण
१६) पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात ?
वातावरण
१७) वातावरणाचे कोणकोणते थर आहेत ?
तपांबर, स्थितांबर, मध्यांबर,आयनांबर, बाह्यबर
१८) पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी १३ किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला काय म्हणतात ? तपांबर
१९) हवामानाशी संबंधीत असलेल्या सर्व घटना कोणत्या थरात घडतात ?
तपांबरात
२०) वाहतुकीची विमाने कोणत्या थराच्या उंचावरच्या भागात उडतात ?
तपांबराच्या
२१) पृथ्वीतलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे ५० किलोमीटरपर्यंतच्या थराला काय म्हणतात ? स्थितांबर
२२ ) स्थितांबराच्या खालच्या वा भागात कोणत्या वायूंचा थर आढळतो ? ओझोन
२३) बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
संघनन
२४) पाण्याच्या बाष्पीभवन, संघनन, पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखादया चक्राप्रमाणे घडत राहतात, याला काय म्हणतात ? जलचक्र
२५) बर्फाळ प्रदेशांत कोणता प्राणी आढळतो ? पांढऱ्या केसांचे ध्रुवीय अस्वल
२६) कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो ? ऑस्ट्रेलिया
२७) उष्ण प्रदेशांत कोणते प्राणी आढळतात ? हत्ती आणि सिंह
२८) सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागांस एकत्रितपणे काय म्हणतात ?
जीवावरण