बीड शहरात इलेक्ट्रिक सिटी बस एप्रिल पर्यंत होणार दाखल electric City bus
Electric City bus एसटी बससह इतर वाहनांमुळे प्रदूषणात होत असलेली वाढ आणि वाढत्या इंधन खर्चामुळे राज्य परिवहन महामंडळाने सन 2024 अखेरीस 5 हजार पर्यावरणपूरक बस ताफ्यात दाखल करीत आहे. यापैकी बीड विभागासाठी देखील पहिल्या टप्यात म्हणजेच एप्रिलपर्यंत 55 बस दाखल होणार आहेत.
शासनाकडून विविध योजनांद्वारे प्रवाशांना वाहतूक दरात सवलत दिली जात आहे. वाढता इंधन खर्च व पर्यावरणपूरक प्रवासासाठी बीड विभागातील 8 आगारांसाठी दोन टप्प्यांत 182 शिवाई बस दाखल होणार असल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान अत्याधुनिक यंत्रणा असलेली ही इलेक्ट्रिक बस एकदा चा केल्यानंतर 350 ते 360 किलोमीटरपर्यंत धावणार आहे. यामुळे दिवसातून केवळ एकदा बस चार्ज करावी लागणार आहे. तसेच प्रतितास 120 किलोमीटर अशी बसची धाव असणार आहे. इलेक्ट्रिक बसच्या तिकीटाचे दर आत्तापेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.