शैक्षणिक सहल संबंधी जोखमीचे शासन परिपत्रक शासन निर्णय educational trip
विदयार्थ्यांना अपघात होतील अशा जोखीम असलेल्या ठिकाणी आणि जिवीतास धोका निर्माण होईल अशा जोखीम असलेल्या ठिकाणी सहली नेण्यास प्रतिबंध करणेबाबत.
संदर्भ : १. अबेदाइनामदार महाविदयालय, पुणे या शाळेचे १३ विदयार्थी समुद्रात बुडून मृत्यमुखी पडल्याची घटना दि. १.०२.२०१६
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, अबेदा इनामदार, पुणे या महाविदयालयाची सहल मुरुड-जंजिरा याठिकाणी असताना समुद्रात बुडून विदयार्थी मृत्युमुखी पडले या पार्श्वभूमीवर प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळेच्या सहली काढताना शासन परिपत्रकातील नियमावलीनूसार पालन करावे असे प्राचार्य, मुख्याध्यापक पुणे विभागातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा कनिष्ठ महाविदयालये यांना कळविण्यात यावे, याबाबत खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी.
शैक्षणिक सहल संबंधी जोखमीचे परिपत्रक येथे पहा
👉PDF download
१)
समुद्राचे बीच, अतिजोखीमेची पर्वतावरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी तसंच उंच टेकडया इत्यादी ठिकाणी शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येवू नये.
२)
विदयार्थ्यांच्या शैक्षणिक सहली नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत इतंभूत माहिती देण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचाव करण्यााबाबत विदयार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
३)
विदयार्थ्यांना सहलीसाठी नेणार असल्यास सोबत प्रथमोपचार पेटी असावी स्थानिक डॉक्टरांचे तसेच जेथे सहल जाणार आहेत तेथील शासकीय रुग्णालयांचे संपर्क क्रमांक सोबत ठेवावेत.
४)
सहलीचे नियोजन करताना त्याचा आराखडा पालकांपर्यंत पोहोचवला जावा, पालकांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात तसेच गरज भासल्यास पालकांचा एक प्रतिनिधी सहलीसोबत ठेवावा.
५)
सहलीला निघण्यापूर्वी विदयार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक राहील.
६)
सहलीचे ठिकाण निश्चित झाल्यानंतर संबंधित ठिकाणाच्या भौगोलिक वातावरणानूसार घ्यावयाची काळजी
७)
व प्राथमिक उपचार इत्यादीबाबत विदयार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जावे. सहली नेहताना फक्त एसटी, बस तसेच अन्य शासकीय मान्यता असलेल्या आरटीओने मान्य केलेल्या
वाहनांतूनच सहली घेवून जाव्यात. दहा विदयार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असावा.
८)
सहलीला आलेल्या विदयार्थिनींना एकटे-दुकटे व नजरेआड फिरण्यास सोडू नये
९)
१०) शिक्षकांनी तंबाखू, गुटखा तसेच अन्य मादक पदार्थांचे सेवन करु नये.
११) सहलीला जाणा-या विदयार्थ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्याची मुभा देण्यात यावी, तसेच सतत पालकांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
१२) हायस्कूलच्या विदयार्थ्यांना ट्रेकिंग, जलक्रीडा इत्यादी परवानगी देण्यात येवू नये.
१३) विदयाथ्यांना सहलीस येण्याची सक्ती करण्यात येवू नये.
१४) विदयार्थ्यांकडून शेणिक सहलीसाठी जादा वर्गणी/जादा शुल्क गोळा करण्यात येवू नये.
१५) मार्थ्यामक व उच्च मार्थ्यामक विदयार्थ्याच्या सहलीचा कालावधी एका मुक्कामापेक्षा जास्त असू नये.
१६) राज्याबाहेरील सहलीस परवानगी दिली जाणार नाही.
१७) सहलीतील विदयार्थ्यांच्या सरंक्षणाची सर्व जबाबदारी संबंधित विदयालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, सहलीतील सर्व शिक्षक यांची राहील.
१८) सहलीत विदयार्थिनीचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका तसंच एक महिला पालक प्रतिनिधी बरोबर असणे आवश्यक राहील.
१९) विदयार्थी/विदयार्थिनीबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
२०) सहलीत शाळेचे विदयार्थी, शिक्षक, शाळेने नॉमिनेटेड केलेला पालक प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त बाहेरील कोणाचाही समावेश राहणार नाही.
२१) प्रार्थामक, मार्थ्यामक, उच्चमाध्यमिक शाळांनी सहली काढताना संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण प्रमुख, शिक्षण उपसंचालक यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहील तसेच संबंधित अधिका-यांना सहलीच्या सर्व बाबी लेखी स्वरुपात अवगत कराव्यात.
२२) प्रार्थामक शाळेच्या सहली हया परिसर भेट तसेच संध्या ५.०० पर्यंत परत घरी अशा स्वरुपाच्या असाव्यात.
२३) सहासी खेळ, वॉटरपार्क, अॅडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढण्यात येवू नयेत.
२४) रेल्वे क्रॉसिंगवरुन बस नेताना शिक्षकांनी सावर्धागरी बाळगावी, रेल्वेचे फाटक नसलेल्या ठिकाणी रेल्वे पुढे गेल्याची खात्री करुनच बस पुढे घेवून जावी.
२५) रात्रीचेवेळी प्रवास टाळावा.
२६) शाळेच्या शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थेचे संबंधित जबाबदार पदाधिकारी या सर्वांवर नियमानुसार गरज भासल्यास कायदेशीर कारवाई /कठोर कारवाई/शिस्तभंगाची कारवाई संबंधित शिक्षणाधिकारी यांचेमार्फत करण्यात यावी.
२७) विदयाथ्यांची हेळसांड, कुचंबना झाल्यास, मानसिक शारिरीक ञास झाल्यास तशी पालकांकडून तक्रार आल्यास संबंधित जबाबदार शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचेविरुध्द कडक कारवाई केली जाईल.
वरील सूचनांचे काटेकोरपणे पालक करुन व तसे हमीपत्र प्राचार्याकडून १००/-रुपयाचे बाँडवर घेवून मगच सहलीला परवानगी दिली जावी. हलगर्जीपण करणा-या अधिका-यांवरसुध्दा कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
School authorities must take location as per age group of students from Govt tourism Authority cell. Fix date and location for school tour, take guideline and measures about that location.
Inform to tourism officer near that location , date for assistance and local guide.
This will help for knowledgeable tourism to upgrowing students and employment to local guides.
मधमाशांनी सहलीवर हल्ला केल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील.
Students must be exempted to visit forts like Shivneri, Raigad so as to know the history of Maratha Kingdom. Teachers or trained facilities handling the students in the trip must be certified in first aid course and mainly CPR.
School managment taking sign of parent for permition for sahal and no any teacher responsible for any accident….. Means teacher are totaly free from thair responcibility…. Take only sign for permition to go
The students should have their trip with concern. Their trip full of education and enjoyment.
Parent willingness & NOC must be obtained & verified
एकीकडे आपले पंतप्रधान म्हणतात की मुलाच्या अंगी धाडस निर्माण करावे , पर्यटनाची आवड निर्माण करावी त्यांना विविध जीवन पद्धती व परिसराचा अभ्यास करण्याची संधी दिली जावी व त्यांनीही ती ज्या ज्या वेळी मिळेल तेव्हा स्वीकारावी अन दुसरी कडे हे विनोदी परिपत्रक , जर समुद्र , डॉगर विहिरी तळी असलेल्या ठिकाणी सहली न्यायच्या नाहीत तर मग कुठे न्यायच्या ?
महाराष्ट्र राज्य शिवाजी महाराजाच्या किल्ल्या मुळेही ओळखले जात अस असताना तिथंही किल्ल्यावर न्यायचे नाही तर मग कुठे न्यायचे?
शहरातील मॉल दाखवत हिडायचे का ?
अपघात होतात त्यात त्या त्या वेळच्या शिक्षकांचा हलगर्जी पणा आणि निसर्गाला चुकीच्या पद्धतीने समोरे जाणे कारणीभूत आहे असा काही अपघात झाला किंवा झाले म्हणून सरसगट सगळ्यांना जायला बंदी घालणे हा तुघलकी उपाय झाला.
सरकार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य ती उपाययोजना करून हा निर्णय मागे घेतील अशी आशा व्यक्त करतो.
-मकरंद चितळे
9822308932