राज्यात दिड कोटी निरक्षारांची संख्या निरक्षरांना जवळच्या शाळेत नोंदनी करण्याचे आवाहन education of illiterate people in Maharashtra
साक्षरता मोहिमेला वेग देण्यासाठी आता सामान्य नागरिकांनीच आपल्या कुटुंबातील निरीक्षकांची नोंदणी लगतच्या शाळेकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात शिक्षक संघटनांनी घातलेल्या बहिष्कार मुळे या योजनेचे काम मंदावले आहे 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये पंधरा व त्यावरील वयोगटातील एक कोटी 63 लाख निरक्षर व्यक्ती आहेत राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण शिक्षण संचालना तर्फे योजना बारा लाख चाळीस हजार निरीक्षणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे परंतु त्यासाठी निरक्षर व स्वयंसेवकांची नोंदणी झालेली नाही.
समाजातील शिक्षित असलेल्या घटकांपैकी जे वेळ देऊ शकतात अशांनी लगतच्या शाळेकडे स्वयंस्फूर्तीने विना मोबदला काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरीक्षणाची आणि स्वयंसेवकांची लगतच्या शाळेकडील नोंदणी करावी फुले यांनी जशी लोक चळवळ उभारून शिक्षणाचे महत्त्व सांगितले त्याप्रमाणे राज्याला शंभर टक्के साक्षर करण्याला करण्यासाठी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे असे आवाहन डॉक्टर महेश पालकर संचालक योजना शिक्षण यांनी केले आहे.