विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदावर पदोन्नती देण्याबाबत मार्गदर्शन मिळण्याबाबत education department officer
महोदय,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांनी दि. २७.०६.२०२३ रोजीच्या पत्रान्वये विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदाच्या पदोन्नती ही ग्रामविकास विभागाच्या दि. ०३.०५.२०१९ च्या मार्गदर्शन पत्र तसेच ग्रामविकास विभागाची दि. १०.६.२०१४ ची अधिसूचनेतील तरतूदी त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने दि. १.८.२०१९ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार पदोन्नतीसंदर्भात एकत्रित मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करुन पदोन्नतीची कार्यवाही करण्यासंदर्भात दिलेले निदेश या सर्व बाबींचा विचार करुन विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ पदाच्या पदोन्नतीसंदर्भात मार्गदर्शन मिळण्याची विनंती केलेली आहे. त्यानूसार शालेय शिक्षण विभागाचे अभिप्राय घेतले असता, त्या विभागाने खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत.
1. शालेय शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीकरिता पदवी परिक्षेमध्ये ५० टक्के गुणाची अट व किमान ५० वर्ष वयाची अट वगळण्यात आली आहे. सबब, विस्तार अधिकारी (शिक्षण) संवर्गाच्या पदोन्नतीकरिताही पदवी परिक्षेबद्दल ५० टक्के गुणाची अट व किमान ५० वर्ष वयाची अट वगळणे योग्य राहील अशी धारणा व्यक्त केली आहे.
विस्तार अधिकारी (शिक्षण) हे पद ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील असल्याने शालेय शिक्षण विभागाने उपरोक्तच्या दिलेल्या अभिप्रायाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-३ श्रेणी-२ या पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरु न करता त्यापूर्वी यासंदर्भातील दिनांक १०.६.२०१४ च्या अधिसूचनेत बदल करण्याच्या अनुषंगाने आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय तात्काळ शासनास पाठवावेत, ही विनंती.