ई कुबेर प्रणाली ठरत आहे शिक्षकांसाठी डोकेदुखीची दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांत असंतोष E- kuber pranali
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : शिक्षकांचे वेतन प्रयोगिक
तत्त्वावर सीएमपी प्रणालीने केल्याने दर महिन्याच्या एक तारखेला वेतन होत असताना पुन्हा शासनाने ई कुबेर प्रणाली विकसित केली. या नवीन प्रणालीमुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून अडले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांत प्रचंड असंतोष पसरला असून म.रा. प्राथमिक शिक्षक संघ याबाबाबत आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे.
प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी शासनाने सीएमपी प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर जिल्ह्यात केला. तो यशस्वी झाल्याने
शिक्षकांत आनंद पसरला होता. त्याचे राज्यात सार्वत्रिक प्रयोग करण्याची मागणी होत असतानाच जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहेत. पुरेसे वेतन अनुदान नसल्याचे कारण सांगून जिल्ह्यात फक्त मूल पंचायत समितीचे वेतन रोखण्यात आले.
आता अनुदान प्राप्त झाले तर नवीन
आलेली ई कुबेर प्रणाली अडचणीची ठरत आहे.
शालार्थ वेतन प्राणालीचे बिल होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. कहर म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतनही अडले आहे. मूल तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक हवालदिल झाले आहेत. पतसंस्थ बँकेचे हप्ते थकलेले आहेत, कर्जाव अतिरिक्त व्याजाचा बोजा पडतोय याशिवाय खर्चास पैसे नसल्यान शिक्षकांत कमालीचा असंतो उफाळला आहे.
पुणे विभागाला कळवूनही समस्या कायम
जिल्हा सरचिटणीस किशोर उरकुंडवार यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांची नाराजी कळविली आहे. त्यावर प्रशासनाने पुणे विभागाशी संपर्क करून समस्या लवकर निकालात काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र वेतनाचा प्रश्न निकाली निघाला नसल्याने शिक्षकांत रोष व्यक्त केला जात आहे.
शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्याच्या दृष्टीने वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार व भेटूनही यावर तोडगा निघाला नाही. आधीच ई कुबेर व शालार्थ प्रणालीचे टेस्टिंग करायला पाहिजे होते. शासनातर्फे असे प्रयोग फक्त शिक्षण विभाग आणि शिक्षकांवरच का केले जातात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. -सुभाष बेरड, जिल्हाध्यक्ष म. रा.
प्राथमिक संघ, चंद्रपूर.