गटशिक्षणाधिकारी यांची कर्तव्य शैक्षणिक भूमिका व प्रशासकीय भूमिका duty of block development officer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गटशिक्षणाधिकारी यांची कर्तव्य शैक्षणिक भूमिका व प्रशासकीय भूमिका duty of block development officer 

गटशिक्षणाधिकारी कर्तव्य खालिल प्रमाणे आहेत

१) गटशिक्षणाधिकारी : (Block Edn. Officer) यांची भूमिका

अ) शैक्षणिक भूमिका

१. विकास गटातील जि.प. प्रा. शाळांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

२. जि.प. प्रा. शाळा व अनुदानप्राप्त खाजगी प्राथमिक शाळा या संस्थांना वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन करणे. सहकार्य वाढविणे.

३. पूर्व प्राथ. अनौपचारिक व प्रौढशिक्षण इ. वर लक्ष देणे, मार्गदर्शन करणे.

४. प्राथ., माध्य., खा. प्रा. शाळा, अन्य विशेष शाळांची शि. वि. अधिकारी यांच्या मदतीने वार्षिक तपासणी करणे.

५. शै. दृष्ट्या अविकसित शाळा, कमी निकालाच्या शाळांना भेटी देणे, सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.

६. शिक्षणाधिकाऱ्यांना उच्च माध्य. शाळा तपासणीस मदत करणे.

७. शै. दर्जा सुधारणेसाठी शिबिरे, कृतिसत्रे, परिसंवाद, चर्चा, प्रशिक्षण वर्ग इ. द्वारे शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देणे, विविध योजनांची कार्यवाही करणे, मार्गदर्शन करणे.

८. शिक्षक, समाज व शाळा यांच्यामध्ये सुसंवाद व सहकार्य वाढविणे. सहशालेय कार्यक्रमात सहभागी करून घेणे.

९. वरिष्ठांकडून शै. कार्यक्रमांबाबत आलेल्या सूचनांचे पालन करणे.

ब) प्रशासकीय भूमिका

१. वर्षातून १२० दिवसांच्या फिरती पैकी ८० बाहेर मुक्काम.

२. विकासगटातील शालेय स्तरांवरील सर्व शै. संस्थांचे व्यवस्थापनावर लक्ष देणे. नियमानुसार प्रशासकिय कारवाई करणे.

३. खा. प्रा. शाळांच्या अनुदानासंबंधी कार्यवाही करणे, खर्चाच्या विनियोगावर लक्ष देणे.

४. जि. प. शाळेतील शिक्षक संख्या शाळानिहाय निश्चित करणे.

५. शिक्षकांच्या बदल्या नियमानुसार करणे, तालुक्याबाहेर बदली प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्याकडे पाठविणे.

६. बदल्या प्रस्ताव सभापतीशी विचारविनिमय करून निश्चित करावा.

७. मासिक फिरती व कामाचे अहवाल वेळच्यावेळी पाठविणे.

८. शिक्षण विषयक सर्व माहिती संकलित करून वरिष्ठांना पाठविणे. (संख्यिकी तपासणी )

९. आलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करणे व नियमानुसार जरूर ती कार्यवाही करणे.

१०. नवीन प्राथ. माध्य. व उच्च माध्य. शाळा उघडण्याबाबत, नवीन उघडलेल्या शाळांना मान्यता देण्याबाबत, अनुदान प्रदान करणे, मान्यता काढून घेणे इ. बाबत जरूर ते प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे.

११. जादा तुकड्यांबाबत शिफारस करणे.

१२. विविध परीक्षांचे आयोजन करणे. (शिष्यवृत्ती, नवोदय, बोर्ड परीक्षा इ.)

१३. विविध शिष्यवृत्त्या, सवलती विद्यार्थ्यांना वेळेवर मिळतात किंवा कसे ते पाहणे.

१४. सर्व शि.वि. अ. यांच्यावर नियंत्रण ठेवणे. व त्यांच्या कामामध्ये सुसंवाद राखणे.

१५. विविध योजनांची अंमलबजावणी होते का ? योजना उत्कृष्टपणे वेळेवर राबविल्या जातात का ? यावर देखरेख ठेवणे. उदा. पुस्तक पेढी, तांदूळ वाटप, उपस्थि भत्ता, गणवेश वाटप, फर्निचर, सवलती.

१६. कार्यालयातील दप्तर व्यवस्थित ठेवणे.

१७. प्रा. शिक्षकांचे पगार, खाजगी संस्थांना अनुदाने इ. कामे वेळीच होतील याची दक्षता घेणे.

१८. कर्मचाऱ्यांचे वेतन, शिक्षक वेतन, निवृत्ती वेतन प्रकरणे इ. कडे लक्ष देणे.

१९. वरिष्ठांकडून वेळोवेळी आलेली कामे सूचनेप्रमाणे वेळेवर पार पाडणे.

२०. पंचायत समिती व अन्य सभांना उपस्थित राहणे.

२१. कर्मचाऱ्यांचेवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे गोपनीय अहवाल ठेवणे.

२२. प्रा. शाळांना गरजेनुसार साहित्याचे वाटप करणे.

२३. शाळांना आकस्मिक भेटी देऊन कामकाजाची पाहणी करणे.

२४. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे. विविध उपक्रम हाती घेणे.

गटशिक्षणाधिकारी यांची कर्तव्य pdf येथे पहा

👉👉pdf download 

Leave a Comment