राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना dress code 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

dress code
dress code

राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना dress code 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अल्पसंख्यांक इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थ सहित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडत असतात तसेच

जनमानसात त्यांच्याकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी पालक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो अशावेळी त्यांचे वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो संबंधितांच वेशभूषा वरूनच त्यांची छाप पडत असते त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषा बद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल याची सर्वत्र ही काळजी घेणे अभिप्रेत आहे.

सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात त्यामुळे जर शिक्षक पदाची वेशभूषा ही अशोकनीय अवस्थेत किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर तसेच त्यांच्यासमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असतो ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्य शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत.

  1. सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षक पदास अनुसरून असावा
  2. सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा
  3. परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा
  4. ऊक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरता एक ड्रेस कोड ठेवण्यात यावा
  5. पुरुष व महिला शिक्षकांकरीता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे
  6. पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा त्यांचा रंग घडत असावा
  7. महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत्राणे यांचा वापर करावा
  8. स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचे ड्रेस राहतील
  9. वैद्यकीय कारण असेल तर  शिक्षकांना बूट शूज वापरण्यातून सवलत देण्यात यावी
शासन निर्णय येथे पहा pdf download 

Leave a Comment