‘परीक्षा पे चर्चा २०२४’ अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करणेबाबत discussion on exam

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘परीक्षा पे चर्चा २०२४’ अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करणेबाबत discussion on exam

संदर्भ :- १) Government of India, Ministry of Education, Department of school education and Literacy, New Delhi यांचे पत्र क्र. D.O.No.6-10/2023-PMP-5,dt 29/12/2023

२) अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे ०४ तथा समन्वयक अधिकारी, PPC यांचे पत्र जा.क्र. रा.मं./परीक्षा-२/१५, दिनांक -०१/०१/२०२४

महाराष्ट्र शासनाचे पत्र येथे पहा 👉PDF download

 

सोबतच्या संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, केंद्र शासनामार्फत ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ हा कार्यक्रम अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये आयोजित केला जाणार आहे. यासाठी संदर्भीय पत्रामध्ये नमूद केल्यानुसार शाळा स्तरावर दिनांक-१२ जानेवारी, २०२४ ते २३ जानेवारी, २०२४ या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. यामध्ये दिनांक १२/०१/२०२४ हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करावयचा आहे. तसेच दिनांक २३/०१/२०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमीत्त पेंटीग च्या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेचा विषय मा. प्रधानमंत्री महोदयांनी परीक्षेचा ताण कमी करण्याकरीता दिलेल्या कानमंत्रावर आधारित असेल याबाबत दक्षता घ्यावी. विद्याथ्यांनी या संपूर्ण कालावधीत स्पर्धा/कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचे सेल्फी काढून पत्रात नमूद केलेल्या हॅशटॅगसह ते सोशल मिडीयावर पोस्ट करावयाचे आहेत.

आयोजन करावयाच्या स्पर्धाची यादी व हॅशटॅग खालीलप्रमाणे –

१. मॅरथॉन रन (hashtagjokhelewokhilePPC24)

२. संगीत स्पर्धा (hashtagchaloschoolchale PPC2024)

३. नक्कल स्पर्धा (hashtagmiletosuceedPPC2024)

४. पथनाट्य (hashtagexamwarrior PPC2024)

५. छोट्या छोट्या व्हिडीओवर चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेली प्रतिक्रिया.

(hashtagletstalkPPC2024)

६. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांची मुलाखत घेणे. (hashtagbeyourownanchorPPC2024)

७. एखादी संकल्पना घेऊन त्याबाबत पोस्टर तयार करणे. (hashtagkahokahaniPPC2024)

८. योगा-ध्यानधारणा कार्यक्रमाचे आयोजन करणे. (hashtagyogaisenergyPPC2024)

९. शाळा संमेलनामध्ये (assembly मध्ये) सुविचार, बोधप्रद गोष्टी, विशेष कार्यक्रम, बातम्यांचे वाचन इत्यादी बाबींचे आयोजन करणे. (hashtagletstalkPPC2024)

१०. स्फुर्तीदायक गीतांचे / राष्ट्रीयगीतांचे (CBSC, KVS, NVS येथील assembly मधील गीतांप्रमणे)

तसेच संदर्भ क्र. १ च्या पत्रामध्ये सदर बाबत करावयाच्या कार्यवाहीचे निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीचे छायाचित्रण उपरोक्त दिलेल्या हॅशटॅगसह ते सोशल मिडीयावर पोस्ट करावे. तसेच स्थानिक वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमाद्वारे प्रसिद्ध करावे.

प्रत्येक शाळेतील पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व राष्ट्रीय स्वातंत्र्य सैनिकांचे पुस्तक देऊन

सन्मानित करावे व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र व परीक्षेला सामोरे जातांना करावयाच्या कार्यवाहीचे पुस्तक (Exam warrior book) द्यावे.

तरी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने व त्यामध्ये दिलेल्या सूचनानुसार केंद्रीय विद्यालय संगठन यांच्या सहभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक १२ जानेवारी, २०२४ ते २३ जानेवारी, २०२४ या कालावधीत विविध स्पर्धा/कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सूचित करावे. अशा प्रकारे दिनांक १२ जानेवारी, २०२४ रोजी राष्ट्रीय युवा दिन यशस्वीरित्या साजरा करणेसाठी उपरोक्त स्पर्धाचे आयोजन करून व दिनांक २३/०१/२०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमीत्त पेंटीग च्या स्पर्धेचे आयोजन करून साजरा करावा. तसेच केलेल्या सर्व कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा.

 

Leave a Comment