विषय शिक्षक मधुन अध्यापक पदावर पदावनत होणेबाबतचे प्रस्ताव सादर करणेबाबत demotion process 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विषय शिक्षक मधुन अध्यापक पदावर पदावनत होणेबाबतचे प्रस्ताव सादर करणेबाबत demotion process

संदर्भ :- या कार्यालयाकडील मंजूर टिपणी दिनांक ३.०५.२०२४

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येत आहे की, ज्या विषय शिक्षक (गणित/विज्ञान, भाषा व समाजशास्त्र) यांना अध्यापक पदावर स्वेच्छेने पदावनत व्हावयाचे आहे. अशा विषय शिक्षकांनी दिनांक २७/०५/२०२४ पर्यंत पदावनत होणेबाबतचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह व कारणासह गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करणेत यावेत. व गट शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे अभिप्रायासह विषयनिहाय प्राप्त सर्व प्रस्ताव दिनांक २८.०५.२०२४ रोजी समक्ष या कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत. तद्नंतर आलेल्या पदावनत प्रस्तावाबाबत विचार विनिमय केला जाणार नाही तसेच यापुढे विषय शिक्षक पदावनत प्रक्रिया केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

तसेच पदनिहाय रिक्त पदांची माहिती यासोबत जोडली आहे. ती सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणावी.

demotion process
demotion process

Leave a Comment