नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत crop crisis 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत crop crisis 

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत crop crisis

अवकाळी अनुदान शासन निर्णय येथे पहा 👉PDF download 

 

शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दि.२७.०३.२०२३ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. तथापि, संदर्भ क्र.४ येथील दि.०१.०१.२०२४ च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

नोव्हेंबर, २०२३ या महिन्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडून दि. ०९.०१.२०२४ च्या तीन स्वतंत्र पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत.

शासन निर्णयः

नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.१४४१०.६६ लक्ष (अक्षरी रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी दहा लक्ष सहासष्ट हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखाशीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे वर अनुक्रमांक २ येथे नमूद दि.२४.०१.२०२३ अन्वये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार पुर्नविनियोजनाव्दारे तरतुद उपलब्ध करुन घेऊन कार्यासन म-११ यांनी हा निधी वितरित करावा. जिल्हाधिकारी यांनी वर अनुक्रमांक २ येथे नमूद

Leave a Comment