मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डॉ. राजेंद्र भारुड

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं मी साक्री तालुक्यातील सावळे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं जगताना पावलोपावली संघर्ष होता.अडचणी होत्या परिस्थिती प्रतिकूल होती पण त्याचा पाऊस करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंत ची मजल गाठता आली नसती.

मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही किंवा मिळालीच नाही अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली उसाच्या पालाची झोपडी म्हणजे घर माझं घर मी मायेच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायला ही माझ्याकडे पैसे नव्हते माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही आमच्याकडे ना जमीन होती ना शेती घरात करता पुरुष नव्हता माळ्यावरच माय वरच सगळी जबाबदारी येऊन पडली पण ती डगमगली नाही ती कधी रडली नाही ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती घरातच चालायचा तो पिणारे ही घरी जायचे माय सांगते मी लहान होतो दुधासाठी रडायचो पण दारू पिणाऱ्यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे म्हणजे मी गप गुमान झोपून घेईन मोठा झालो आणि मग दारू पिणाऱ्यांना चणे फुटाणे चकणा आणून देऊ लागलो हे काम करणं भागच होतं पण म्हणून माईन आम्हाला फक्त याच कामाला जिंकलं नाही मोठ्या भावाला आश्रम शाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो घरी येऊन अभ्यास करत होतो पेन पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे पण शिकायला छान वाटत होतं आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.

पण आमचे शिक्षक इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारण नव्हतं आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामे करण्यासाठीच एकदा परीक्षा होती ओट्यावर बसून अभ्यास करत होतो दारू प्यायला आलेल्या एकाने मला चकणा म्हणून देण्यास सांगितलं पण परीक्षेमुळे मी सगळं नाही सांगितलं समोरचा चिडला आणि शिकून असा कोणता मोठा डॉक्टर इंजिनियर होणार असं म्हणून मलाही नव्हतं मायला ते शब्द खूप लागले आणि होईल माझं पोट डॉक्टर इंजिनियर असं ठामपणे म्हणून गेली.

त्या माणसाच्या हिना हिनवण्यान मला खूप वाईट वाटलं आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का असा विचार झाला पण क्षणभरच मायन माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता हा विश्वास खरा करायचा ठरवलं.

पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएससी अभ्यासक्रमासाठी प्रवेश (entry)मिळाला गावापासून 150 किमी दूर होती शाळा माय आली होती सोडवायला माय पासून दूर कसा राहायचं या विचाराने रडायला आलं माहेरी खूप रडू रडत होती पण माय पासून दूर राहून शिकणं भाग होतं मायेची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं की संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही संधीचं चीज करायचं मी घरापासून दूर राहून शिकत होतो मन लावून अभ्यास करत होतो दहावीला उत्तम गुणांनी पास झालो बारावीला 97 टक्के गुण मिळाले आणि स्वतःच्या गुरांच्या जोरावर मुंबईतील जीएस मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला कॉलेजच्या वस्तीगृहात राहण्याची सोय झाली वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता बारीक-सारी खर्चाचे पैसे माय पाठवत होती मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला (year)होतो एकीकडे इंटरनॅशनल चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास मायेचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीही गंध नव्हता मायला तर मी फक्त डॉक्टर कीच करतो आहे असं वाटत होतं यूपीएससीची परीक्षा काय असते कशासाठी असते कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं तिनं तर तोपर्यंत तिच्या आयुष्यात गावात कधी तहसीलदार प्ही आलेला बघितला नव्हता आणि मी आयएएस ऑफिसर ची तयारी करत होतो वर्ष संपला आणि माझ्या एका हातात एमबीबीएस ची पदवी आणि दुसऱ्या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.

घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनसाठी येत होती कलेक्टर तहसीलदार पुढारी मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोक का येत आहेत मी मायला सांगितलं की मी डॉक्टर की पास झालो मायला खूप आनंद झाला पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टर की सोडली मायला काही कळेच ना मी म्हटलं की डॉक्टर की सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे मायला एवढं समजत होतं की आपल्या पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे माझे नातेवाईक गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाज बांधव यांना पण छान वाटलं पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळला नव्हता लोकांनी तर आपला राजू कंडक्टर झाला मनात माझ्या कौतुक केलं.

माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे 2012 पासून माझी माय आता माझ्यासोबत आहे इथे मला करण्यासारखं खूप आहे नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा शिक्षण रस्ते सार्वजनिक आरोग्य (health)व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची सुधारणांची नितांत गरज आहे आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.

आज मला अनेक जण विचारतात की माझा हक्क बालपण करून पण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं या अवस्थेतला जगणं मला अनुभवताच (exprience) आला नाही पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणून माझ्यात टाकत येत होती अक्कल बालपण उघड्या आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीने गेलं खेळाच्या खेळायला आंब्याच्या कोई होत्या विटी दांडू होते नदीत पोहत होतो डोंगर चळत होतो शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं माझी माय माझीच माणसं सगळेच गरीब सगळ्यांच्या पोटाला अर्धा कोटी राहण्याची पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय त्यामुळे आमच्या ला अमुक मिळत आहे चांगलं खायला प्यायला मिळते आणि आपल्याला मात्र उपाशी राहावे लागते असं वाटण्याची परिस्थिती नव्हती सगळे सारखे कोणाच्या आनंदाने स्वतःच्या परिस्थितीला दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती काही नव्हतच कोणाकडे कमीपणा तर तरी कर मग कशाच्या बाबतीत पारगाव छान वाटत होतं गरिबीत पण आपण आनंद वाटत होता.

पण मुंबईला शिकायला(learning) गेलो आणि पहिल्यांदा गरीबीची जाणीव झाली पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचा दुःख मानलं नाही पहाटे साडेचारला उठायचं योग करायचं अभ्यासाला बसायचं कॉलेज काम युपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती हातातल्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता तेव्हा जर फेसबुक वर पोस्ट लिहित राहिलो असतो आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाचे दुःखद कथा वगळत राहिलो असतो तर इतर पोहोचलोच नसतो आपल्या दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हाताकडे पाहिलं नाही मला इतकंच कळत होतं आपली आपली परिस्थिती आपल्या लाच बदलायची आहे तीही न कुडता आणि न थकता.

वयाच्या 31 व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोट्या संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथपर्यंत पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षाने मला आज काय दिले हे मी महत्त्वाचं मानतो.

आज ३१ व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?

जगण्याचे हर प्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारे भूक अनुभवले आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्ल समाजातील तरुण जेव्हा आहेस ऑफिसर होतो. भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते इथेही काहीतरी बदलतोय घडतंय आणि जाणीव होते. लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढेच जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.

(जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड नंदूरबार)

Leave a Comment